You are currently viewing वेताळ बांबर्डे-मुस्लिमवाडीवासीयांशी राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी साधला संवाद

वेताळ बांबर्डे-मुस्लिमवाडीवासीयांशी राज्याचे सा. बां. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी साधला संवाद

मुस्लिमवाडीवासीयांना समस्या मार्गी लावण्याचे चव्हाण यांनी दिले आश्वासन..

कुडाळ :

आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण दौऱ्यावर आले असून त्यांनी महामार्गासंबंधीच्या तक्रारीबाबत नागरिकांच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या. वेताळ बांबर्डे-मुस्लिमवाडीवासीयांनी आपल्या समस्या मांडताना रहदारीच्या पुलाच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी वेताळ बांबर्डे सरपंच संध्या मेस्त्री, आरिफ मुजावर, शहबाज शेख, आनंद शिरवलकर, दादा साईल, भाई सावंत, अवधूत सामंत तसेच मुस्लिमवाडीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुस्लिमवाडीवासीयांना आपली समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + five =