कुडाळ :
कुडाळ येथील बॅरिस्टरनाथ पै बी.डए. कॉलेज केंद्रामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम. ए. योगा शिक्षण क्रमाला नुकतीच मान्यता मिळाली असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर व मनाच्या निरोगीपणासाठी योग, व्यायाम, प्राणायामची नितांत आवश्यकता अधोरेखित झाली आहे. भारताचा हा योग वारसा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नातून जगभरात स्वीकारला आहे. याचा अर्थ मानवी जीवनात योगाचे महत्त्व आता सर्व जगाला पटलेल आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेने 2023 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सलग्न बॅरिस्टर नाथ पै बी.एड. केंद्रावर डिप्लोमा इन योग टीचर हा कोर्स सुरू केला.
त्याला समाजातून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. आणि सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये योगाचे महत्व लक्षात घेऊन बॅरिस्टर नाथ पै नाथ शिक्षण संस्थेने सन 2025 पासून ‘एम ए इन योग’ (सिंधुदुर्ग जिल्यातील पाहिला योगातील मास्टर डिग्री कोर्स) या शिक्षणक्रमाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी सलग्नता घेऊन तो सुरू केलेला आहे.
सध्या त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि मर्यादित जागा शिल्लक आहेत. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी केंद्र समन्वयक नितीन बांबर्डेकर ९४२३८३२७०५, केंद्रप्रमुख परेश धावडे ९४२०८२२८७८, अरुण मर्गज ९४२३३०२८५९, डॉ.संगीता तुपकर ९४०३२९८८१७ यांच्याशी संपर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्था चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.