You are currently viewing इन्सुली खामदेव चौकात डंपर व टेम्पोत अपघात

इन्सुली खामदेव चौकात डंपर व टेम्पोत अपघात

बांदा

इन्सुली खामदेव चौकात डंपर व टेम्पोत आज सकाळी अपघात झाला. गोव्यातून कुडाळच्या दिशेने जात असताना डंपर चालकाने गतिरोधक नजीक वाहनाचा वेग कमी केला. मात्र, मागाहून येणाऱ्या टेम्पो चालकाला त्याचा अंदाज न आल्याने मागाहून जोरदार धडक दिली. यात टेम्पोच्या दर्शनी भागाचे अतोनात नुकसान झाले आहे. चालक व क्लीनर मात्र अपघातातून बालंबाल बचावले. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा