You are currently viewing पिंंगुळीत प.पू. अण्णा राऊळ महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

पिंंगुळीत प.पू. अण्णा राऊळ महाराज जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

कुडाळ

प. पु. सद्गुरू समर्थ अण्णा महाराज यांचा ७८ वा जयंती उत्सव सोहळा, गौरीशंकर मंदिराचा २८ वा वर्धापन दिन सोहळा गेले दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पिंगुळी नगरीत झाली होती.

यानिमित्ताने रविवार दिनांक १२ मार्च रोजी पहाटे काकड आरती, दुपारी महाप्रसाद,सायं राऊळ महाराज भक्त मंडळ मुंबई यांचे भजन, सांजआरती,रात्री जिल्हास्तरीय लोक नृत्य स्पर्धा, प. पु. विनायक अण्णा महाराज यांच्या भक्त भाविक यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला.( दीपोत्सव ) सोमवार दिनांक १३ मार्च रोजी पहाटे काकड आरती, सकाळी प. पु. स. समर्थ राऊळ महाराज समाधी पूजन व समाधीकडील सार्वजनिक अभिषेक | गौरीशंकर मंदिराचा २८ वा वर्धापन दिन गोरीशंकर मंदिरात लघुरुद्र, प. पु. विनायक (अण्णा) महाराज पादुका पूजन (भक्त भाविकांच्या उपस्थितीत नामस्मरण महाआरती ), ३५ अपंगाना कृत्रिम जयपूर फुट चे वाटप प. पु. स. स. विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्या वतीने सहकार्य रोटरी कल्याण मंडळ, कोल्हापूर जनकल्याण रुग्णोपयोगी सेवा साहित्य केंद्र – कुडाळ , दुपारी राऊळ महाराज समाधीस्थानी श्रींची आरती, दुपार पासून रात्री उशिरापर्यंत अखंड महाप्रसाद, दुपारी कोकणरत्न संतोष शिर्सेकर, राजापूर यांचे संगीत भजन,प.पू. अण्णा महाराज जन्मोत्सव (पाळणा झोका कार्यक्रम ), सप्तसूर सादरकर्ते श्री. राऊळ महाराज परिवार महिला भजन मंडळ पिंगुळी यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी बाल आविष्कार, श्री राम सेवा संघ, मयडे, बार्देश गोवा गायक कलाकार कु. दिव्या चारी, कु. उर्वी नाईक. कु. आर्या नाईक आणि कु.विदिता नाईक. मार्गदर्शक पांडुरंग व अवधूत चारी साथी कलाकार कु. कौस्तुभ चारी, कु. प्रणव चारी कु. सिद्धी दाभाळे निवेदन सौ. निलिमा चारी अभंग- बालगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, भावगीत व लावणी. सोबत हेथवी सेठिया-विश्वा, कलर्स मराठी प्रस्तुत सूर नवा ध्यास नवा फेम, सांजआरती श्री राऊळ महाराज समाधी स्थानी, गौरी शंकर मंदिर आणि श्री. अण्णा महाराज समाधी स्थानी, सायंकाळी ७.३० वा.दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ कासार्ड, कणकवली बुवा प्रकाश पारकर यांचे सुश्राव्य भजन , रात्री आकर्षक दिडी साई कला क्रीडा मंडळ कसाल, कुंभारवाडी नवीन बांदेकर भाग्योदय मित्रमंडळ गांगोची राई कसाल यांच्या खास आकर्षक दिडीचे आगमन झाले, रात्री वाजता ढ मंडळी प्रस्तुत बिलीमारो हा नाट्य प्रयोग (राज्यस्तरीय अटल करंडक विजेते आदी कार्यक्रम संपन्न झाले . दोन दिवस पिंगुळी नगरीत झालेल्या या कार्यक्रमाला भाविक भक्त प.पू. राऊळ महाराज व प.पू.अण्णा महाराज यांच्या नामस्मरणात रंगुन गेले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × five =