You are currently viewing इचलकरंजीत शिवशाहीर कै.राजाराम जगताप पथ नामकरणाचा रविवारी कार्यक्रम

इचलकरंजीत शिवशाहीर कै.राजाराम जगताप पथ नामकरणाचा रविवारी कार्यक्रम

इचलकरंजी

इचलकरंजी शहरातील लंगोटे मळा काँर्नर परिसरात शिवशाहीर कै.राजाराम जगताप पथ नामकरण कार्यक्रम रविवार दि.१६ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तसेच नगरसेवक सागर चाळके यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

इचलकरंजी शहराचे सुपूत्र शिवशाहीर कै.राजाराम जगताप यांनी आपल्या पहाडी ,भारदस्त आवाजातून शिवकालीन इतिहासाला जाग आणत समाजात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग चेतवले.तसेच समाज प्रबोधन करत
शाहीरी कलेचा प्रचार व प्रसार करण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या शाहीरी कलेतून इचलकरंजी शहराबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचे नांव राज्याबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. त्यामुळे त्यांचे समाज प्रबोधनाच्या कार्यातील योगदान कायम स्मरणात रहावे ,याच उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर व अशोक कुंभार यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेवक सागर चाळके यांच्या सहकार्यातून
लंगोटे मळा काँर्नर परिसरात शिवशाहीर कै.राजाराम जगताप पथ नामकरण कार्यक्रमाचे
रविवार दि.१६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता
आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते तसेच नगरसेवक सागर चाळके ,
शाहीर विजय जगताप ,
माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते , मनसेचे नेते पुंडलिक जाधव ,नगरसेवक प्रकाश मोरबाळे ,माजी नगराध्यक्ष राजाराम धारवट ,माजी नगराध्यक्षा सौ.मेघा चाळके ,शाहीर चंद्रकांत जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे ,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संजय आरेकर व अशोक कुंभार यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seventeen =