You are currently viewing बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणार :समीर नलावडे

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देणार :समीर नलावडे

कणकवली

बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाईल.
कणकवली शहराचा आवठडी बाजाराचा दिवस सोडून बचत गटांनी इतर एक दिवस
ठरवून तो आम्हाला सांगावा. त्या दिवशी फक्त बचत गटांना स्टॉल लावावेत. बचत गटांना व्यवसायसंबंधी मदत लागल्यास ती केली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
माविम सिंधुदुर्ग स्थापित हिरकणी कक्ष व नगरपंचायत कणकवली अंतर्गत सीएमआरसी व नगरपंचायत स्थापित कनकसिंधू शहर स्तर संघ कणकवलीची ३
री वार्षिक सर्वसाधारण बैठक आयोजित केली. या प्रसंगी श्री. नलावडे बोलत होते.
यावेळी माविम सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक अधिकारी नितीन काळे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक प्रशांत पाटील, हिरकणी सीएमआरसी अध्यक्ष उदयमती देसाई, कणकसिंधू सीआयएफ अध्यक्ष सुचिता पालव, सचिव प्रणाली कांबळे,
सहसचिव स्वाती राणे, सदस्य दिव्या साळगावकर, इशा कांबळी,शुभांगी उबाळे इतर पदाधिकारी, अमोल भोगले, हिरकणी सीएमआरसीच्या व्यवस्थापक सीमा गावडे सहयोगिनीच्या दीपा सरुडकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. काळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले.हिरकणीच्या देसाई यांनी महिलांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दीपा सरुडकर यांनी उरलेलं अन्न फेकून न देता त्याच एकत्र संकलन करून दान करण्याविषयीची रॉबिन आर्मी टीमची संकल्पना व उद्देश स्पष्ट केला. उद्योग केंद्राचे पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले. अमोल भोगले महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सीमा गावडे यांनी केली. सूत्रसंचालन क्षेत्रीय समन्वयक सिद्धी नलावडे मॅडम यांनी केले. आभार सहयोगिनी स्नेहा कदम यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + three =