You are currently viewing सुप्रसिद्ध भजनीबुवा कै. चंद्रकांत चव्हाण यांचा “भजनसिंधु” च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून श्रद्धांजली कार्यक्रम

सुप्रसिद्ध भजनीबुवा कै. चंद्रकांत चव्हाण यांचा “भजनसिंधु” च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या माध्यमातून श्रद्धांजली कार्यक्रम

भजनरूपी सेवेतून वाहिली कै. चंद्रकांत चव्हाण बुवा यांस संगीतमय आदरांजली

 

कोकणचे सुपुत्र तसेच सुप्रसिद्ध भजनीबुवा कै. चंद्रकांत चव्हाण बुवा यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि सलग्न संस्था “भजनसिंधु”, पुणे यांच्यावतीने अतिशय भावपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवड येथे नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि कै. चव्हाण बुवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी मुंबईहून त्यांचे गुरुवर्य सुप्रसिद्ध भजनीबुवा नारायणजी अनुभवणे , नामांकित पखवाज वादक लक्ष्मण वाडकर,अजय पेडणेकर पुण्याचे सुप्रसिद्ध भजनीबुवा सत्यमजी बागवे , तसेच पिंपरी चिंचवड, पुणे परिसरातील त्यांचे भजनीक्षेत्रातील जेष्ठ मित्रमंडळी, भजनप्रेमी आणि भजनरसिकही आवर्जून उपस्थित होते


उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतेवेळी कै. चव्हाण बुवांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांच्या परिवारातील सदस्य आणि सर्वच उपस्थित भजनप्रेमी त्यांच्या आठवणींनी भावुक झाले. त्यानंतर उपस्थित भजनी कलाकारांनी आपली भजनीकला सादर करून कै. चव्हाण बुवांना खऱ्याअर्थाने संगीतमय श्रद्धांजली अर्पण केली.आजचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करून भरभरून प्रेम आणि सांत्वन केल्याबद्दल कै. चव्हाण बुवांच्या परिवाराकडून यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ पुणेचे रुपेश काणेकर, सुनील साळसकर, नरेंद्र धुरी, संतोष परब, चंद्रकांत गायकवाड, पराग पालकर, बाळू गुरव, राजेश कांडर, प्रकाश साईल आदि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. तसेच भजनसिंधु आणि सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने अध्यक्ष अजय पाताडे यांनी कार्यक्रम नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी ज्यांनी मेहनत आणि सहकार्य केले त्यासर्वांचेच आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. चंद्रकांत गायकवाड यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =