You are currently viewing ९ मे १९६८ एकीकरण समिती

९ मे १९६८ एकीकरण समिती

भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे लिखित लेख

९ मे १९६८ एकीकरण समिती

राज्याच्या तीन प्रदेशात म्हंजे पश्चिम महाराष्ट्र/ विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये ग्रामासमितीची तालुका व जिल्हा स्तरावर महसूल अधिकारी/ कर्मचारी यांच्याकरिता निरनिराळ्या महसुली नियुक्ती आणि त्यासंबंधी शासनाला शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय व वन विभाग क्रमांक इएसटी १०६८/६८५ इ दिनांक ९ मे १९६८ अन्वये महसुली लेखे कार्यपद्धती आणि नियमपुसतिका या संबधिची एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीचे नाव “” एकीकरण समिती “” असे आहे.
या समिती मध्ये श्री एच एस मानवीकर आय ए एस हे उपसचिव महसूल व वन विभाग हे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.
श्री के व्हि देसाई आय ए एस जिल्हाधिकारी सातारा सदस्य म्हणून काम पाहत होते.
श्री बी.जी देशमुख आय ए एस जिल्हाधिकारी अकोला सदस्य म्हणून काम बघत होते ‌
सचिवालयाचया महसूल वन विभाग या समितीच्या कामासाठी खालील पदे निर्माण केलेली आहेत
* अवर सचिव
* अधीक्षक
* सहहयक
* लिपिक
* लघुलेखक
* टंकलेखन
* चरराशी
अवर सचिव वन विभाग हे सचिव म्हणून काम करतात अवय सचिव पदावर अधिकारी नियुक्ती होईपर्यंत श्री जे ‌टी. चिटणीस अवर सचिव महसूल व वन विभाग यांनी आपली सवताची कर्तव्य संभाळून समितीचे सचिव म्हणून काम केले. १३ आॅगसट १९६८ पर्यंत पदाचा कार्यभार धारण केला. त्यानंतर १ आॅगसट १९६८ पासून श्री पी.सी जोशी ३ आॅगसट १९६९ पासून शासकीय सेवेतून निवृत्त झाले. तेव्हा पासून श्री जे टी चिटणीस अवर सचिव महसूल व वन विभाग यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली.
समितीच्या नियुक्ती संबंधित शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक ९ मे १९६८ मध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे समितीचे विचारार्थ आहे
जमीन महसूल कायद्याची अद्यावत नियम पुस्तिका. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व त्या संहितेच्या उपबंधाखाली काढलेले नियम आणि सार्वत्रिक आदेश यांचा समावेश करण्यात आला
महसुली प्रशासनाच्या बाबींसंबंधी वेळोवेळी काढण्यात आलेले प्रशासकीय आदेश/ परिपत्रके शासन निर्णय तपासणे आणि निरनिराळ्या विषयांवरील सर्वसमावेशक परिपत्रकाचया स्वरुपात संग्रहित करणे विचारांत होते.
राज्यातील निरनिराळ्या प्रदेशामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा यांच्या क्षेत्रांतील ग्राम तालुका आणि जिल्हा पातळीवर महसूली लेखयाचया विद्यमान पध्दती तपासणे आणि महसुली लेखयाची एकीकरण संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत
राज्यातील निरनिराळ्या प्रदेशातील तालुका जिल्हा कार्यालयाची कार्यपद्धती तपासणे आणि तिच्या एकीकरणासाठी प्रस्ताव मांडणे
मंडलधिकारी/ मंडल निरीक्षक / तलाठी यांची कार्यपद्धती कर्तव्य व कार्य यांची त्यांना आपली कर्तव्य पार पाडताना अनुभवावया लागणार्या अडचणीच्या विशेष संदर्भात तपासणी करणे आणि त्यांच्या एकिकरणासाठी सूचना देणे
या समितीने जमीन महसूल या नियम पुस्तिकेचे तीन खंड साध्या आणि सोप्या भाषेत तयार करून शासनाला प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
“”” खंड एक “”
* सांवधिक विधि म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
* अधिनियम १९६६ अंतर्गत तयार करण्यात आलेले नियम
* जमीन महसूल संहिता उपबंधाखाली काढलेले सांवधिक आदेश
“”” खंड दोन “”
* तालुका जिल्हा कार्यालयाची कार्यपद्धती
* तालुका व त्यापेक्षा वरच्या पातळीवरील महसूल अधिकाऱ्यांनी महसूल संबंधित असलेले जमीन महसूल बाबीवरिल आदेश अनुदेश शासन निर्णय परिपत्रके
“” खंड तीन “”
* मंडल निरीक्षक आणि तलाठी यांची कार्यपद्धती कर्तव्य आणि कार्य
* ग्राम महसुली लेखे संबंधित नमुने व त्या नमुन्या संबंधित सूचना
समितीचे काम सुरू होण्यापूर्वी अध्यक्षांनी समितीचे सचिव श्री चिटणीस यांच्याशी औरंगाबाद येथे दिनांक ३१ मे १९६८ रोजी प्रारंभीक चर्चा केली. नियम पुस्तिका खंड तीन नुसार समितीला कराव्या लागणाऱ्या कामांची माहिती घेतली. ३० जून १९६८ रोजी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या बैठकीत समितीने आपल्या विचारार्थ विषयावर सर्वसाधारण चर्चा करण्यात आली .
शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक युअआर एम १३६८ आर दिनांक १८ सप्टेंबर १९६८ अन्वये शासनाने या नियमांना मंजुरी दिली आहे.१९६९ पासून समितीवर स्विकृत करून सर्व आय ए एस अधिकारी यांना घेण्यात आले आहे.
आकटोंबर १९६९ घ्या सुमारास समितीच्या १५ बैठकी झाल्या आणि महसूल अधिकारी नियम पुस्तिकेच्या ३ खंडाच्या संबंधातील निरनिराळ्या बाबींवर व विषयांवर प्रस्तावना व चर्चा करण्यात आली.
खंड एक/ दोन/ तीन/ प्रारुपा सह विचारार्थ विषयांमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व बाबींवर आमच्या शिफारशी समाविष्ट करणारा एकच अहवाल सामान्यपणे शासनास सादर करण्यात आला ‌. जमीन महसूल अधिनियम १९६६ लागू असला तरी अधिनियमाच्या निरनिराळ्या उपबंधानवये विशेषत कलम ३२८ चे पोट कलम (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या बाबींवर नियम तयार करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.
ग्राम पातळीवर महसूली लेखा जोखा पध्दतीचे एकीकरण आणि तलाठी. मंडल निरीक्षक आणि मंडल अधिकारी यांची कार्यपद्धती कर्तव्य आणि कार्ये यासंबधीथ प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
सर्वसामान्य गोरगरीब जनतेची जमीन फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अमलात आणली गेली आहे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 3 =