You are currently viewing जन्माष्टमी

जन्माष्टमी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

🌹 जन्माष्टमी 🌹

देवकीच्या पदरात
परब्रम्ह प्रकटले
तोडी अवघी बंधने
चराचर आनंदले !!

आला आला हरी घरी
झाला गोकुळाला हर्ष
निसर्गात ठायीठायी
भरे आनंदी जल्लोष !!

देवकीचा तान्हा तोची
कान्हा नंद यशोदेचा
सान थोर आनंदले
बाळलीला पाहू जाता!!

गोविंदाने नादावले
वेडे होई वृंदावन
गोप गोपिकांचा फेर
जमा होतसे गोधन !!

राधा-कृष्ण, मीरा-कृष्ण
प्रीती, भक्तीचे प्रतीक
कृष्ण द्रौपदीसी रक्षी
नाते बांधवाचे नेक !!

विश्व उध्दरण्यासाठी
देव घेई अवतार
होई भक्तापाठीराखा
सखा कृष्ण योगेश्वर !!

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =