You are currently viewing शासकीय ऑफिस मधील कागद रद्दी जाते कुठं ??

शासकीय ऑफिस मधील कागद रद्दी जाते कुठं ??

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*शासकीय ऑफिस मधील कागद रद्दी जाते कुठं ??**

शासकीय निमशासकीय कार्यालये असो अथवा असं कोणतंही ठिकाणं नाही जिथ कागद वापरला जात नाही. आज सर्व शुभ कार्य असो. वाढदिवस. श्रध्दांजली. सर्व शहरी व ग्रामीण भागातील सर्व गोरगरीब व सर्वसामान्य नेते पुढारी आमदार खासदार मंत्री समाजसेवक यांना सुध्दा प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मग ते कामं सार्वजनिक हितासाठी असो अथवा वैयक्तिक हितासाठी असो . संपत्ती . स्थावर मालमत्ता. जमीन घरं खरेदी करण्यासाठी आपणांस लागतो तो म्हणजे कागदच मग अशा सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय यामध्ये आधारकार्ड. पॅन कार्ड. रेशनकार्ड. हयात दाखला. मृत्यू दाखला. रहिवासी प्रमाणपत्र. योजनांचे अर्ज. तलाठी अहवाल. तहसिलदार उत्पन्न दाखला. शाळा सोडल्याचा दाखला. घरफाळा पाणीपट्टी. विविध करांच्या पावत्या. अशा विविध ठिकाणी आपणांस वेळोवेळी कागदपत्रे दाखल करावी लागतात मग तेच तेच कागद वेळोवेळी घेतले जातात मग अशा विविध योजनांच्या माध्यमातून गोळा होणारी कोट्यवधी टन कागदी रद्दी जाते कुठं?? यासाठी कोणत्या नेत्यांचा कागद कारखाना आहे तेथें जाते कां ??
बांधकाम कामगार यांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी तीच कागदपत्रे झेरॉक्स मारून घेतली जातात अशा बांधकाम कामगार यांची सर्व माहिती संबंधित आॅफिस कडे असताना सुध्दा बांधकाम कामगार यांना झेरॉक्स पैसे घालावे लागतात आणि कागद जातो कुठ हे माहीत नाही उदा २०२०/२०२१/२०२२ या कालावधीत मध्ये बांधकाम कामगार यांना जवळपास ४० हजार सुरक्षा संच वाटप करण्यात आले त्यावेळी सर्व बांधकाम कामगार यांची माहिती मंडळाकडे असताना सुद्धा सुरक्षा संच मिळविण्यासाठी कागदोपत्री झेरॉक्स खर्च पर कामगार ८० रूपये झेरॉक्स कागदपत्रे पर कामगार १५ म्हंजे ४० ×१५ किती कागद गोळा झाले आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठ गेली ही रद्दी कोट्यवधी रुपये कुणी मिळवलं काय माहित आहे कां ??
तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व विविध कार्यालय तहसिलदार. जिल्हा परिषद. पंचायत समिती. जिल्हाधिकारी . अन्न औषध प्रशासन विभाग. महिला व बाल कल्याण विभाग . समाजकल्याण विभाग . विविध नोंदणी कार्यालय. कामगार विभाग . आर्थिक विकास महामंडळ. जलसंधारण विभाग. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभाग. पाणीपुरवठा विभाग. स्वच्छता विभाग. ग्रामपंचायत. नगरपालिका. महानगरपालिका. सार्वजनिक बांधकाम विभाग. स्टॅम्प. दस्त कार्यालय. कार्यालय यामध्ये पुरवठा विभाग. महसूल विभाग. पेन्शन विभाग. आपत्ती संरक्षण विभाग. रेकाॅरड विभाग. विविध हजेरी हलचल विभाग. विविध दाखले उतारे. यासाठी वेळोवेळी सर्वसामान्य लोक पत्रव्यवहार करतात यावेळी रोज हजारों कागद सदर आॅफिस मध्ये दाखल होतात . त्यातून कामाचा एकच कागद मागं दिला जातो मग गोळा होणारें हजारों कागद कुठं जातात काय माहित कां ??
उदा पुरवठा विभाग मध्ये नाव कमी करणे. नाव वाढविणे. नवीन रेशनकार्ड काढणे. अन्न सुरक्षा मागणी अर्ज. विभक्त रेशनकार्ड. यासाठी बरिच कागदपत्रे मागितली जातात. आणि रोज या कार्यालयात लोक रोज आपल्या अडचणी मागणीसाठी विविध अर्ज दाखल करतात त्यातील कागदपत्रे माग दिली जात नाहीत मग ही गोळा होणारी रद्दी जाते कुठ याचा
अंदाज काढण्याची गरज आहे ??
कागद कसा तयार झाला याची माहिती आपण घेत आहोत.
मानवी जीवनात कागदाला खूप महत्त्व आहे. सुरुवातीला हा कागद हाताने बनवला जात असे. पुढे कागद तयार करण्यासाठी यंत्रांचा वापर करण्यात आला. आधुनिक काळात कागद बनवण्याच्या अनेक पद्धती प्रचलित झाल्या आहेत. बँक पेपर, बाँड पेपर, बुक पेपर, शुगर पेपर, फोटो पेपर, इंकजेट पेपर, यार्न पेपर, क्राफ्ट पेपर, ड्रॉइंग पेपर, वॅक्स पेपर, वॉल पेपर इत्यादी कागदाचे अनेक प्रकार आहेत. कागदापासून पुस्तके, प्रती, कॅलेंडर, पिशव्या, पतंग, डायरी इत्यादी विविध प्रकारच्या उपयुक्त वस्तू बनविल्या जातात. आज कागद प्रामुख्याने गवत, बांबू, लाकूड, जुने कपडे, उसापासून बनवले जात आहेत. कागदाच्या निर्मितीमध्ये सेल्युलोजची मोठी भूमिका असते. सेल्युलोज हा एक विशेष प्रकारचा फायबर आहे. सेल्युलोज एक सेंद्रिय संयुग आहे. हे तीन प्रकारचे अल्फा सेल्युलोज, बीटा सेल्युलोज, गामा सेल्युलोज. कापसात ९९% अल्फा सेल्युलोज असते. वनस्पतींमध्ये सेल्युलोज नावाचे कार्बोहायड्रेट असते, ज्यापासून वनस्पती पेशी तयार होतात. हे झाडाच्या खोडात आढळते. वनस्पतीमध्ये सेल्युलोजचे प्रमाण जितके चांगले असेल तितके चांगले कागद तयार होतील. कपाशीमध्ये सेल्युलोजचे प्रमाणही जास्त असते. पण महाग असल्याने त्याचा वापर कागद बनवण्यासाठी होत नाही. त्यामुळे कापसाचा वापर कापड तयार करण्यासाठी केला जातो. सेल्युलोज, लिग्निन आणि पेक्टिन यांच्याबरोबरच खनिज क्षार, स्निग्धांश, हिरड्या, प्रथिने इत्यादीही वनस्पतींमध्ये आढळतात, त्यामुळे झाडाच्या खोडापासून उत्तम कागद तयार केला जातो. मुख्यतः बांबू, देवदार, भोज, चिनार, फर, सफडा इत्यादी झाडांच्या खोडापासून कागद तयार केला जातो. इत्यादी देखील आढळतात, त्यामुळे झाडाच्या खोडापासून सर्वोत्तम कागद तयार केला जातो. प्रामुख्याने बांबू, देवदार, भोज, चिनार, फर, सफडा इत्यादी झाडांच्या खोडापासून कागद तयार
40 वर्षांत जगभरातील कागदाचा वापर 400% वाढला आहे, ज्यामुळे जंगलतोड वाढली आहे, कापलेल्या झाडांपैकी 35% झाडे कागद बनवण्यासाठी वापरली जातात. बहुतेक कागदी कंपन्यांनी जंगले पुन्हा जंगली करण्यात मदत करण्यासाठी झाडे लावली आहेत. 10% पेक्षा कमी लाकडाचा लगदा जुन्या-वाढीच्या जंगलांच्या तोडण्यापासून येतो, परंतु हा सर्वात वादग्रस्त मुद्दा आहे.
यूएसमध्ये दरवर्षी तयार होणाऱ्या एकूण कचऱ्यापैकी 40% पर्यंत कागदाचा कचरा होतो, एकट्या यूएसमध्ये प्रतिवर्षी 71.6 दशलक्ष पेपर कचरा जोडतो. अमेरिकेतील एक होल्डिंग ऑफिस वर्कर सुमारे 31 पेपर पृष्ठे छापतो. अमेरिकन दरवर्षी 16 अब्ज पेपर कप वापरतात.
ब्लीचिंग पेपरच्या सोप्या पद्धतींमुळे अतिरिक्त क्लोरीनसह वातावरणात रसायने (क्लोरीनयुक्त डायऑक्सिनसह) सोडली जातात . डायऑक्सिन्स हे एक मजबूत पर्यावरणीय प्रदूषक मानले जाते, ज्याचा वापर आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली आहे. डायऑक्सिन्स अत्यंत विषारी असतात आणि मानवावरील आरोग्यावरील परिणामांमध्ये पुनरुत्पादन, विकास, रोगापासून प्रतिकारशक्ती आणि हार्मोनल समस्या यांचा समावेश होतो. ते कार्सिनोजेनिक आहे . मानवांमध्ये 90% डायऑक्सिन्स अन्नातून येतात, विशेषतः, मांस, दूध, मासे आणि शेलफिश यासारख्या अन्नातून, कारण डायऑक्सिन प्राण्यांच्या चरबीमध्ये साठवले जातात.
वनस्पतींमध्ये सेल्युलोज नावाचे कार्बोहायड्रेट असते . वनस्पती पेशींच्या भिंती सेल्युलोजपासून बनलेल्या असतात. म्हणून, सेल्युलोज हा वनस्पती शरीराचा मुख्य पदार्थ आहे. सेल्युलोजचे तंतू एकत्र करून एकसमान पातळ पत्रा तयार करून जी वस्तू तयार केली जाते त्याला कागद म्हणतात. सेल्युलोजची चांगली मात्रा असलेली कोणतीही वनस्पती किंवा सामग्री कागद बनवण्यासाठी योग्य असू शकते. कापूस हा जवळजवळ शुद्ध सेल्युलोज आहे, परंतु तो कागद तयार करण्यासाठी वापरला जात नाही कारण तो महाग आहे आणि मुख्यतः कापड तयार करण्यासाठी वापरला जातो . सेल्युलोज तंतूंमध्ये शीट्समध्ये एकमेकांशी जोडले जाण्याची मालमत्ता आहे, म्हणून केवळ त्यातून कागद तयार केला जाऊ शकतो. रेशीम आणि लोकरतंतूंमध्ये असे एकसंध गुणधर्म नसल्यामुळे ते कागद बनवण्यासाठी वापरता येत नाहीत. सेल्युलोज जितका शुद्ध असेल तितका कागद स्वच्छ आणि सुंदर बनतो. कापडाच्या चिंध्या आणि कागदाच्या स्क्रॅपमध्ये जवळजवळ 100% सेल्युलोज असते, त्यामुळे ते कागद सोपे आणि चांगले बनवतात. इतिहासकारांचा असा अंदाज आहे की चीनमध्ये पहिला कागद कापडाच्या चिंध्यापासून बनवला गेला होता .
सेल्युलोजसह इतर अनेक पदार्थ वनस्पतींमध्ये आढळतात, ज्यामध्ये लिग्निन आणि पेक्टिन पुरेशा प्रमाणात असतात आणि खनिजे, चरबी आणि रंगद्रव्ये कमी प्रमाणात असतात. हे पदार्थ काढून सेल्युलोजला पुरेशा प्रमाणात वेगळे केले जात नाही तोपर्यंत सेल्युलोजपासून चांगला कागद बनवता येत नाही. लिग्निन काढणे विशेषतः आवश्यक आहे. सेल्युलोजमध्ये लिग्निनची पुरेशी मात्रा असल्यास, सेल्युलोज तंतूंना एकमेकांशी संवाद साधणे कठीण होते. सुरुवातीला, वनस्पतींमधून सेल्युलोज त्याच्या शुद्ध स्वरूपात मिळवण्याची एक चांगली पद्धत शोधून काढण्यापर्यंत, कागद मुख्यतः फाटलेल्या सूती कापडांपासून बनविला जात असे. चिंध्या आणि कागदाच्या कचऱ्यापासून कागद अगदी सहज आणि उत्कृष्ट दर्जाचा बनवला जात असला तरी, कागदाची आपली संपूर्ण गरज त्यांच्यापासून बनवलेल्या कागदातून भागेल एवढ्या प्रमाणात कागद मिळणे शक्य नाही.
आज खालील वस्तू मुख्यतः कागद बनवण्यासाठी वापरल्या जातात: चिंध्या, कागदाचे तुकडे, बांबू, विविध झाडांचे लाकूड, जसे की ऐटबाज आणि पाइन आणि विविध गवत जसे की सबाई आणि एस्पार्टो. बांबू आणि सबाई गवत प्रामुख्याने भारतात कागद बनवण्यासाठी वापरतात
‌ ऑफलाईन पद्धत महाराष्ट्र शासनाने बंद केली कारणं लोकाचा पैशांचा अपव्यय टाळावा. आणि ऑनलाईन पध्दतीने सर्व काम करण्याचा आदेश संबंधित विभागांना दिला आहे पण आजही काही शासकीय निमशासकीय कार्यालये कागदाची मागणी करताना आपणांस दिसत आहेत. आजचं आपल्या आपल्या गावात शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालयात माहिती अधिकार दाखल करून संबंधित विभागात गोळा होणारी रद्दी याची माहिती मागवा बघा लाखों नाही करोडो रुपयांची उलाढाल आहे आपणास कळलं नाही आपणं झेरॉक्स चा रुपया बघतो पण अशा रुपयांनी गोळा होणारे कागद कोट्यवधी रूपयांची माया गोळा होत आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + ten =