You are currently viewing न्हावेली युवकांकडून श्रमदानातून केली रस्त्याची साफसफाई.

न्हावेली युवकांकडून श्रमदानातून केली रस्त्याची साफसफाई.

न्हावेली

न्हावेली शाळा नंबर 1 ते न्हावेली माऊली मंदिर या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी यामुळे वाहन चालक याना होणारा त्रास व गणेश चतुर्थीच्या पाश्वभूमीवर न्हावेली युवकांनी एकत्र येत श्रमदानातून या रस्त्याची साफसफाई केली. वाढलेली झाडी आणि वळणावळणाचा रस्ता यामुळे या मार्गातून रहदारी करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी अपघातांना निमंत्रण देत होती. ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वी युवकांनी एकजुटीने या मार्गाची साफसफाई केल्यामुळे वाहन चालका मधून ग्रामस्थांमधून सर्वांचे आभार तसेच कौतुक करण्यात येत आहे. या श्रमदानात प्रसाद गावडे , सुदन पार्सेकर, योगेश पार्सेकर , तुळशीदास पार्सेकर , सचिन पार्सेकर , नवनाथ पार्सेकर , अजय पार्सेकर , प्रमोद पार्सेकर, प्रसाद आरोंदेकर, प्रथमेश आरोंदेकर, राजाराम पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, बाबलो पार्सेकर, समीर पार्सेकर, सिद्धेश पार्सेकर, श्रेयस गावडे, चेतन पार्सेकर , संकेत पार्सेकर, विशाल धवन, शैलेश भगत, प्रथमेश नाईक, अमोल पार्सेकर , राकेश पार्सेकर आदींनी श्रमदानात सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा