You are currently viewing खाकीला कवडीमोलचा हफ्ता आणि घासभर जेवणावर चालतो सोशल क्लबच्या नावावर जुगार

खाकीला कवडीमोलचा हफ्ता आणि घासभर जेवणावर चालतो सोशल क्लबच्या नावावर जुगार

*कणकवलीतील बाबांच्या नावावरील क्लबची कर्मकथा*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे श्री बाबांच्या नावाने सुरू असलेला सोशल क्लब हा खाकी वर्दीला मिळत असलेला कवडीमोल हप्ता आणि क्लबच्या खाली हॉटेलमध्ये एक वेळचं जेवण यामुळे विशेष चर्चेत आलेला आहे. कणकवलीतील बाबांच्या नावे सुरू असलेल्या जुगाराचा बादशहा टिंगेल मेंटेरो आणि दात पडक्या आप्पा यांच्या भागीदारीतील बाबांच्या नावे असलेल्या स्पोर्ट्स क्लब मध्ये सोशल क्लबच्या नावाखाली केवळ जुगार खेळला जातो. खाकी वर्दीला या सोशल क्लब कडून कवडी मोलाचा हप्ता आणि क्लब खालील हॉटेलमध्ये जेवण तेवढे दिले जाते.

कणकवलीत सुरू असलेल्या सोशल क्लब मध्ये अलीकडेच तब्बल तीन वेळा जुगारावरून मारामारी झाली आहे. या सोशल क्लबच्या विरोधात अनेक वेळा पोलिसांमध्ये निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु क्लब वर धाडीच्या नावाखाली खाकी वर्दी केवळ लोकांची दिशाभूल करत असते. या स्पोर्ट्स क्लब मध्ये पत्त्यांच्या खेळांच्या नावावर पैसे लावून रमी, तीन पत्ती सारखे जुगार खेळले जातात. या खेळातून दिवसाला तब्बल 40 हजार रुपये क्लबच्या मालकाला मिळतात. खाकी वर्दीचा हप्ता आणि दिवसाचा खर्च इत्यादी वगळला असला तरी क्लबचा मालक एका दिवसातच मालामाल होतो.

जुगाराचा बादशहा म्हणून कणकवलीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात ओळख असलेला टिंगल मेंथेरो आणि दात पडक्या आप्पा व मोरजीचा ड्रायव्हर यांचे 60 पैसे आणि इतरांचे 40 पैसे अशी विभागणी करून या सोशल क्लब मध्ये जुगाराचे पैसे वाटून घेतले जातात. पैसे देऊन कॉइन वर इथे जुगार चालतो. पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये पॉईंटची रमी खेळली जाते. जुगारावरून क्लब मध्ये मारामारी झाली की पार्टनर बदलून टिंगल मेंथेरो आणि दात पडक्या आप्पा बाबांच्या नावाचा क्लब चालवतात. कणकवलीतील स्थानिक खाकी वर्दी कवडीमोल हप्त्यावर खुश आहेत, परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक याबाबत अनभिज्ञ असतात.

खाकी वर्दीला मिळणाऱ्या कवडीमोल हप्त्यावर क्लब मध्ये मात्र महिना काठी क्लब चालवणारे लाखो रुपये कमाई करतात. त्यामुळे सामाजिक स्तरावर खाकी वर्दी कडून बाबांच्या नावे सुरू असलेल्या स्पोर्ट्स क्लब वर होत असलेल्या मेहरनजर मुळे टीका होताना असून देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या क्लबवर का कारवाई केली जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =