You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ” आरोग्य कृती समिती” ची स्थापन – एस.टी.सावंत, वरिष्ठ सल्लागार.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ” आरोग्य कृती समिती” ची स्थापन – एस.टी.सावंत, वरिष्ठ सल्लागार.

जिल्ह्यातच रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी हेच “आरोग्य हक्क कृती समितीचे” उद्दिष्ट – राजन रेडकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जनसामान्यांकरिता आरोग्यसेवा ही जवळ जवळ असून नसल्यासारखी असल्याचे चित्र या कोरोना महामारीच्या काळात दिसून आले आहे. जिल्ह्यातील रुग्णांना उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने, रुग्णांना उपचाराकरिता कोल्हापूर, गोवा राज्यात किंवा मुंबई येथे घेऊन जावे लागते.
आपल्या सिंधुदुर्ग जिल्हामध्ये उपलब्ध असलेली आरोग्यसेवा ही भविष्यात सुधारून मुंबईतील केईएम व जे जे रुग्णालयाच्या धर्तीवर सुसज्ज शासकीय रुग्णालय व्हावे तसेच गावपातळीवर स्वस्त औषधांकरिता जनरिक मेडिकल स्टोअर्स असावे ही देखील काळाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा अनेक हॉस्पिटल संबंधित अत्यावश्यक जिव्हाळ्याचा प्रश्नांकरिता ज्येष्ठ शेतकरी नेते बाळासाहेब सावंत यांच्या अध्यक्षतेखाली “आरोग्य हक्क कृती समिती” स्थापन करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सल्लागार एस. टी. सावंत यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “आरोग्य हक्क कृती समिती” मध्ये महेश सावंत, राजेन्द्र नरसाळे, गुरुनाथ तिरपणकर, यशवंत जड्यार, शांताराम नाईक, बाळा काणेकर, राजन रेडकर, सत्यवान चव्हाण, बाबल नांदोसकर, विठ्ठल चव्हाण, दिनेश मेस्त्री, प्रसाद गावडे, आशिष सुभेदार, नितीन गावकर, श्रीकृष्ण सावंत, सौरभ नागोळकर, राजाराम चिपकर, राजेश सातोसकर तसेच समितीचे कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड.मंगेश गाड, ऍड.अमित सावंत, डॉ.अमितकुमार गोविलकर, डॉ.नीता पाटील अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समाविष्ट असलेली “आरोग्य हक्क कृती समिती” ची स्थापन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील या कृती समितीच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध प्रश्नांवर संघर्ष व प्रसंगी जनआंदोलनाच्या माध्यमातून अपेक्षित आरोग्यसेवा सामान्य नागरिकांना मिळवुन देण्याचे कार्य कृती समिती करेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच शासकीय रुग्णालयाच्या मार्फतीने रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी हे उद्दिष्ट ठेवूनच कृती समिती कार्य करणार आहे. याकरिता जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी आरोग्य हक्क कृती समितीस सहकार्य करण्याचे आवाहन राजन रेडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 1 =