You are currently viewing अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी निलेश गोवेकर यांचा जन्मदिन साजरा

अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी निलेश गोवेकर यांचा जन्मदिन साजरा

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांचा जन्मदिन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अनंत पिळणकर यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांचा जन्मदिन आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या फोंडा नवीन कुर्ली येथील निवासस्थानी केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चव्हाण, सखाराम हुंबे, संतोष चव्हाण, उत्तम तेली, बाळा मसुरकर, सुजल शेलार, वैभव मलांडकर राजू मेस्त्री, शुभम सुतार, महेश पाटील तुषार पिळणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा