You are currently viewing मुंबई-गोवा महामार्गावर दोन वाहनांचा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर दोन वाहनांचा अपघात

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर जानवलीतून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकीची दोन वाहनांना धडक बसली. जानवली मारुती मंदिरसमोर हा अपघात झाला. यात कार मधील एक महिला जखमी झाली आहे. सकाळी ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली.

पुण्याहून मालवणच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारची समोरील जात असलेल्या अमेझ कारला धडक बसली. क्रेटा वेगाने अमेझ धडकल्याने या अमेझ कारच्या पुढे असलेल्या रिक्षेला देखील मोठी धडक बसली. धडक एवढी भीषण होती की क्रेटाचा समोरील बहुतांशी भाग दबला गेला होता. क्रेटा ने धडक दिलेला अमेझा कार मधील एक महिला धडकेने गाडीच्या बाहेर फेकली गेली. व तिला गंभीर दुखापत झाली. हा अपघात शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळताच जानवली पोलीस पाटील मोहन सावंत, मकरंद सावंत, परेश परूळेकर, कीर्तिकुमार राणे, दामू सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात रिक्षा व दोन्ही कारमधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातात रिक्षा व दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा