You are currently viewing शासकीय वसतिगृहात ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहात ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहात ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

   समाज कल्याण कार्यालयांतर्गत असणाऱ्या मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरीता शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्जाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तरी इच्छुक विद्यार्थी व विद्यार्थिनीं ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे प्रभारी सहाय्यक आयुक्त तुषार गवळी यांनी केले आहे. 

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली व वेंगुर्ला असे एकूण 3 तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे शासकीय वसतिगृह, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला व देवगड असे 05 एकूण 08 शासकीय वसतिगृहांमध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विद्यार्थी, विद्यार्थींनींना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर मोफत ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 ते 10 वी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करावयाचा दिनांक 30 जून 2026 तसेच कनिष्ठ महाविद्यलये इयत्ता 11 वी व 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करावयाचा दि. 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज करावयाची संधी उपलब्ध झाली आहे.

            या योजनेचा लाभ घेण्याठी अटी व शर्ती याप्रमाणे आहे. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, सदर विद्यार्थ्यी मागील अभ्यासक्रमास 50 टक्यापेक्षा जास्त गुण असावेत.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 40 टक्के इतकी राहील. विद्यार्थ्यांनी सन 2026-27 वर्षामध्ये ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची  पीडीफ व शैक्षणिक आवश्यक कागदपत्रांसह नजीकच्य मुलांचे, मुलींचे शासकीय वसतिगृह किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिधुदुर्ग  कार्यालय येथे समक्ष, टपालाव्दारे परिपूर्ण अर्ज सादर करावेत.

            या शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय, आदी सुविधा विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येतात. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी तालुक्यास्तरावरील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल, अधीक्षीका किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02362 228882 वर  संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा