“विचाराना कृतीची जोड देणारे अवलिया, अर्थात डॉ. अमेय देसाई.
…. ॲड. नकुल पार्सेकर..
व्यासपीठावरून वैचारिक मांडणी करणे अगदी सहज सोपे असते. आपण या विचारांप्रमाणे वागतो अशी आभासी प्रतिमा निर्माण करणारे पावलोपावली आढळतात. काहीजण तर आपण अमुक अमुक विचारांचा खंदे समर्थक आहोत असे भासवून स्वतःची पोळी भाजून घेतात… पण याला छेद देणारे आणि आपल्या विचारांवर नुसती निष्ठा नव्हे तर त्यानुसार कृती करणारे एक अवलिया मिञ गेल्या चार वर्षापासून माझ्या संपर्कात आले. संघ परिवाराचे खऱ्या अर्थाने थिंक टॅक असलेल्या स्व. श्रध्देय दत्तोपंत ठेंगडीजी़च्या विचाराने प्रभावित होऊन डॉ. अमेय देसाई यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. आपल्याला जी काही संधी मिळेल त्याचा उपयोग आपण समाजातील गरजू लोकांसाठी केला पाहिजे हा त्यांचा आग्रह. कोकणातील गेल्या पाच वर्षातील आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान मोलाचे आहे.
स्व. मनोहर पर्रीकर आणि मा. सुरेश प्रभू हे त्यांचे आदर्श. चार वर्षापूर्वी जेव्हा ते प्रभू साहेबांच्या संपर्कात आले तेव्हा या दोघांचीही केमेस्ट्री परफेक्ट जमली. जेव्हा जेव्हा अमेय देसाई यांच्याबाबत साहेबांशी चर्चा होते तेव्हा साहेब म्हणतात, ” अमेय, खूप चांगला मुलगा आहे, सामाजिक भान ठेवून काम करतो. ”
दुर्दैवाने लहानपणीच आईचे छायाछत्र हरपले, मात्र भारतीय रिझर्व बॅकेत कार्यरत असलेले आणि काही वर्षापूर्वी निवृत्त झालेल्या त्यांच्या पिताश्रीनी अमेयला मोठा भावनिक आधार दिला. स्वतःचे दु:ख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सुखदुःखात समरस होणारे अमेय देसाई एक वेगळेच रसायन आहे. त्यांच्यात एक सेवाभावी समर्पित समाजसेवक दडलेला आहे.. त्यांचा सहवास म्हणजे आपणही काहीतरी समाजपयोगी केले पाहिजे ही उर्जा देणारा स्रोत. या जिल्ह्यातील रचनात्मक काम करणाऱ्या कार्यकर्त्याना पारखून त्यानां कामाला लावण्याचे एक वेगळ कसब त्यांच्याकडे आहे.
निसर्ग संपन्न अशा कुडाळ तालुक्यातील नेरूरच्या या भूमीपुञाची नाळ या मातीशी घट्ट जोडलेली आहे. जात, धर्म, पंथ, पक्ष या पलिकडे जाऊन समाजातील विविध घटकांमध्ये काम करणारे हे डॉ. अमेय देसाई एक संवेदनशील साहित्यिक आहेत.
यापूर्वी त्यांनी आपल्या अनुभवावर आधारित “पिंपळपान” हे पुस्तक लिहिले ज्याची प्रत घेऊन ते मला देण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी मुद्दामहून माझ्या घरी आले होते.
राष्ट्रोत्थानाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत असणाऱ्या या आमच्या मिञाने “मर्मबंध” हे पुस्तक लिहिले ज्याचे प्रकाशन शिवाजी पार्क दादर येथील सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे १४ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार असून यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अमेय देसाई विविध क्षेत्रात काम करतात ते त्यांचे निकटवर्तीय आमदार श्रीकांत भारतीय, महिला विद्यापीठाच्या कुलगुरू मा. डॉ. उज्वला चक्रदेव, सुप्रसिद्ध स्ञीरोगतज्ञ व लेखक डॉ. संजय ओक, ठाणे जनता सहकारी बँकचे अध्यक्ष मा. शरद जी गांगल अशा महानुभावांच्या उपस्थित होणार असून मी या सोहळ्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहणार असून या जिल्ह्यातील डॉ. अमेय देसाई यांचे मिञ श्री मोहन होडावडेकर, श्री राजू केसरकर, श्री प्रसन्ना उर्फ बाळू देसाई वगैरेची खास उपस्थित असणार आहे.
डॉ. अमेय देसाई यांची ही मर्मबंधातील ठेव अशीच माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला सदैव उर्जा देत राहील. त्यासाठी डॉ. अमेय देसाई यांचे विशेष आभार आणि “मर्मबंध” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
______________________________
*संवाद मीडिया*
👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓👨⚕👩⚕👩💻👩🎓👨🎓
_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_
🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/
_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_
_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_
▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_
_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_
_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_
🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_
_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._
🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_
🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_
🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_
🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_
🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_
🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_
_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/
https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*