You are currently viewing दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणचीच बाजी…

दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणचीच बाजी…

मुंबई

गेली अनेक दिवस प्रतीक्षेत असलेला दहावीचा निकाल आज जाहीर झाला असून या वर्षीसुद्धा कोकण विभागाने बाजी मारली आहे. यात ९९.२७ टक्के इतका अव्वल निकाल कोकण विभागाचा लागला आहे. तर सर्वाधिक कमी निकाल ९५.९० टक्के इतका नाशिक विभागाचा लागले आहे.

विद्यार्थ्यांना आज दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे. तत्पूर्वी विभागीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात पुणे 96.96,नागपूर 97.00, औरंगाबाद 96.33,मुबंई 96.94, कोल्हापूर 98.50,अमरावती 96.81,नाशिक 95.90, लातूर 97.27, कोकण 99.27 इतका निकाल लागला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा