You are currently viewing वैद्यकीय साहित्य बँक मनसे सुरू करणार : परशुराम उपरकर

वैद्यकीय साहित्य बँक मनसे सुरू करणार : परशुराम उपरकर

वॉकर, बेड, कॉट, काठया, शौच खुर्ची, कुबड्या विनावापर असल्यास देण्याचे आवाहन

कणकवली

वॉकर, बेड, कॉट, काठया, शौच खुर्ची, कुबड्या अशा वैद्यकीय कारणांसाठी अल्पावधीकरता लागणाऱ्या वस्तू मनसेच्या माध्यमातून गोरगरिबांना उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय साहित्य बँक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ज्यांनी अशा वस्तू घेतलेल्या आहेत व अल्पावधीत वापर करून विनावापर पडून आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास अशा वस्तू सदर बँकेत जमा करून गरजूंना मोफत देण्याचा प्रयत्न असल्याचे मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे. अनेकदा गरजू आजारी रुग्णासाठी वॉकर, बेड, कॉट, काठी, शौच खुर्ची, कुबड्या अशा अनेक वस्तू खरेदी कराव्या लागतात. या वस्तू काही महिन्यांसाठी वापरात येतात त्यानंतर या पडून राहतात अशा वस्तूची बँक सुरू करण्याच्या अनुषंगाने आमचा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे अशा वस्तू आहेत त्याने आमच्याशी संपर्क साधल्यास या बँकेत जमा करून गरजूंना नाममात्र अनामत रकमेवर वापरावयास देण्यात येतील. त्यांचा वापर पूर्ण झाल्यावर या वस्तू बँकेत जमा करून आपली अनामत रक्कम न्यावयाची आहे. यादृष्टीने आमच्या प्रयत्न सुरू आहे. अनेकदा गोरगरिबांना अशा महागड्या वस्तू घेणेही शक्य होत नाही. अशावेळी या बँकेचा उपयोग होऊ शकतो. काहीवेळा अशा वस्तू या पंधरा दिवस महिना-दोन महिने एवढ्याच कालावधित वापरावयाचे असतात. नंतर त्या घरातच पडून राहतात. सदर वस्तू साठीच्या बँकेत या दिल्यास त्याचा गोरगरिबांना उपयोग होऊ शकतो. संबंधितांनी आमच्याशी संपर्क साधल्यास त्या नेण्याची व्यवस्था करण्यात येईल. तरी अशा वस्तू कुणाकडे असतील तर त्यांनी उपजिल्हाप्रमुख दया मेस्त्री 8830896135 संपर्क साधावा, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − 2 =