कुडासे ग्रामपंचायतच्या नागरी सुविधा केंद्राचे भूमिपूजन

कुडासे ग्रामपंचायतच्या नागरी सुविधा केंद्राचे भूमिपूजन

दोडामार्ग :

दोडामार्ग तालुक्यातील पहिल्याच नागरी सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन कुडासे येथे जि प सदस्य संपदा देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने ग्रामविकास खात्याकडे आले असलेल्या योजनेतून 4 लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. नागरी सुविधा केंद्र ग्रामपंचायतींना नाही अशा ग्रामपंचायतींना राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अंतर्गत निधी मंजूर केला जात आहे. असे गावाला मंजूर झालेले हे तालुक्यातील पहिलेच नागरी सुविधा केंद्र आहे. या इमारतीचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी पंचायत समिती उपसभापती धनश्री देसाई, सरपंच पूजा देसाई, उपसरपंच आत्माराम देसाई, सदस्य राजाराम देसाई, भाग्यश्री राऊळ, प्रसाद कूडास्कर, गणपत देसाई,  उदय गवस, किशोर देसाई, रामदास मेस्त्री आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा