You are currently viewing गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त

गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त

मळेवाड येथील भुईमूग व भातशेतीचे अतोनात नुकसान

वैभव नाईक यांनी वेधले वनविभागाचे लक्ष

गव्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. मळेवाड धनगरवाडी येथील भात शेती व भुईमूग पिकाचे गव्यांच्या कळपाने अतोनात नुकसान केले आहे. मळेवाड (ता.सावंतवाडी) येथील वैभव नाईक या युवकाने शेती व्यवसाय करणेच पसंत केले. यावर्षी त्याने भात शेती बरोबरच भुईमूग पीकही घेण्याचा निर्णय घेतला. नियोजनबद्ध मशागत केल्यामुळे भुईमूग शेती समाधानकारक दिसत होती. रात्रभर राखण करायची, पहाटे घरी परतल्यावर गव्यांचा कळप भात शेती व भुईमूग पिकाचे नुकसान, त्यामूळे शेतकरी हवालदिल झाला आहे, शअशी खंत वैभव नाईक यांनी व्यक्त केली.
वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा, मानवी वस्तीत घुसनाऱ्या वन्य प्राण्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी वैभव नाईक यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =