नारायण राणे यांच्याकडून वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांचा सन्मान…

नारायण राणे यांच्याकडून वैभववाडी मंडळ अध्यक्ष नासीर काझी यांचा सन्मान…

पक्ष संघटनेत केलेल्या उल्लेखनीय कामाची दिली पोचपावती.

वैभववाडी
माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी तालुका मंडळ अध्यक्षपदी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नासीर काझी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. नासीर काझी यांच्या अंगी असलेले नेतृत्वगुण हे कौतुकास्पद आहेत. वैभववाडी तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष पदावर त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श इतरांनीही घ्यावा. मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता असून देखील पक्षसंघटनेत सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांनी काम केले आहे. त्याचे अनुकरण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा