You are currently viewing ग्रामपंचायतींना मिळणार मिनी फायर फायटर

ग्रामपंचायतींना मिळणार मिनी फायर फायटर

कुडाळ,वैभववाडी,देवगड,दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविणार.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून 2 कोटी 20 लाख रु निधी मंजूर..

पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटना व नागरिकांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, देवगड,व दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविण्यासाठी प्रत्येकी 55 लाख प्रमाणे एकूण 2 कोटी 20 लाख रु चा निधी मंजूर केला आहे.

जिल्ह्यातील व्यापारी संघटना व नागरिकांनी छोट्या नगरपंचायतींना अग्निशमन सेवा पुरविण्याची मागणी पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे केली होती. या मागणीसाठी व्यापारी संघटनांच्या शिष्टमंडळाने नितीन वाळके यांच्या समवेत पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती.त्यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्हा वार्षिक योजना 2020-21 अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण अंतर्गत कुडाळ, वैभववाडी, देवगड,व दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविण्याच्या 2 कोटी 20 लाख रु निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.त्यामुळे या नगरपंचायतींचा अग्निशमन सेवेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे.याबद्दल नितीन वाळके यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − one =