You are currently viewing टिंगेल मेंथेरोचा क्लब शासनमान्य असेल तर खाकी वर्दीला हफ्ता कशासाठी?

टिंगेल मेंथेरोचा क्लब शासनमान्य असेल तर खाकी वर्दीला हफ्ता कशासाठी?

कणकवलीत (बा)जूक हॉटेलमध्ये क्लबच्या नावावर जुगार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये नैतिकता बाजूला सारत अनैतिक धंद्यांना पेव आला आहे. बेरोजगार असलेल्या अनेकांनी घरातील मौल्यवान वस्तू विकून, गहाण ठेऊन मिळालेल्या पैशात जुगार खेळून घरदार वाऱ्यावर सोडले आहे. जुगाराच्या बैठका गावागावात वाट्टेल तिकडे बसत आहेत, त्यावर धाड पडल्यावर होणारे नुकसान आणि भरभक्कम हफ्ता वाचविण्यासाठी जुगाराच्या बादशहांनी नवनवीन क्लुप्त्या लढविल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीने चालणारा शासनमान्य सोशल क्लब.
सोशल क्लबच्या नावाखाली कणकवली शहरात मध्यवर्ती ठिकाणी (बा)जूक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगाराच्या क्लब चा *संवाद मीडियाने* पर्दापाश केल्यावर क्लब मध्ये रोख रक्कम ठेवली जात नाही. (बा)जूक हॉटेलमध्ये चालणाऱ्या या जुगाराच्या क्लब मध्ये ५,१०,२०,५०,१००,२००,५००,२००० अशा रकमेचे कॉईन्स ग्राहकाकडून रक्कम स्वीकारून दिले जातात. त्याला कॉन्टर असे म्हणतात. क्लब च्या या खेळांमध्ये पत्त्यांचा जोड असला तर चारशे रुपयांना वीस हजार रुपये, पत्त्यांचा सिक्वेन्स असला तर शंभर रुपयांना दहा हजार रुपये, रमी झाल्यावर (क्लब मध्ये रमी ला बाजी म्हणतात) दोन हजार रुपयांना दहा हजार रुपये मिळतात. पत्त्यांचा या जुगारात दिसणारे आकडे मोठे असल्याने अनेक जण सोशल क्लब मध्ये जुगार खेळायला येतात. अशाप्रकारे कणकवलीत (बा)जूक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर *सोशल क्लब या गोंडस नावावर खाकी गर्दीच्या आशीर्वादाने जुगार चालतो.*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असताना रस्त्यावर उतरणाऱ्या पक्षीय कार्यकर्त्यांप्रमाणे बेकायदेशीर, अनैतिक व्यवसाय करणार्यां २५/३० जणांच्या जमावाला देखील हॉटेलमध्ये एकत्र येत जुगार खेळण्यास मुभा दिल्याचे दिसून येत आहे. (बा)जूक हॉटेलच्या बाहेरील बाजूस लागलेल्या चारचाकी, दुचाकी गाड्या पाहूनच अनैतिक व्यवसायातून मिळणाऱ्या पैश्यांच्या आशेवर किती लोक जुगाराच्या अड्डयांवर जातात हे समजून येते. भर बाजारपेठेत सोशल क्लब च्या नावाखाली सुरू असणाऱ्या जुगाराच्या अड्डयांकडून हफ्ता मिळत असल्याने खाकीचा देखील आशीर्वाद मिळतो. त्यामुळेच बिनबोभाटपणे असे जुगाराचे अड्डे सुरू असतात. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अशा सोशल क्लब वर का मेहेरनजर करतात? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत आहे..

प्रतिक्रिया व्यक्त करा