You are currently viewing १३ जुलैला भालचंद्र महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा

१३ जुलैला भालचंद्र महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 

कणकवली :

 

कणकवली येथे परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात बुधवार, १३ जुलैला गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५.३० पासून समाधीस्थान, नित्यपूजा, काकडआरती, सर्व भक्तांच्यावतीने पाद्यपूजा व अभिषेक, सकाळी दहा १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ वा. महाप्रसाद, २ ते सायंकाळी ६वा.भजनांचा कार्यक्रम ,७.३० वा. धुपारती, रात्री ८वा. भालचंद्र महाराजांची दैनंदिन आरती होईल. भाविकांनी उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =