You are currently viewing २०२९ पर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

२०२९ पर्यंत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या पहिल्या दोन क्रमांकावर

*मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास*

*मोदी सरकारचे आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टीनेमुळे देशाची प्रगती*

कणकवली :

२०१४ मध्ये श्री. नरेंद्र मोदी भारत देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशाची सर्वांगीण प्रगती सुरू झाली. आर्थिक नियोजन आणि दूरदृष्टी ठेवून प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत पुढे घेऊन जाण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देश सर्वांगीण दृष्ट्या सक्षम बनविला. गेल्या अकरा वर्षात जगात भारत देशाची प्रतिमा उजळून निघाली. देश महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागला. आज जपान सारख्या देशाला मागे टाकून आपण आर्थिक दृष्ट्या पुढे गेलो आहोत. २०२९ पर्यंत आपला भारत देश जगातील महासत्तेच्या पहिला दोन क्रमांकावर पोहोचणारा देश असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता होईल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मोदी सरकारने करारा जबाब देत नव्या भारताची ओळख जगाला करून दिली असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीला अकरा वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने विकसित भारताचा अमृत काल, सेवा सुशासन आणि गरीब कल्याण हे मोदी सरकारची अकरा वर्ष विकासाची ध्येय दृष्टी गाठणारी होती याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, संयोजक मनोज रावराणे, सहसंयोजक लखमराजे भोसले, डॉ. मिलिंद कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, मागास सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, कणकवली तालुका भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, देवगड माजी नगराध्यक्ष साळसकर, आदी उपस्थित होते.

मंत्र नितेश राणे म्हणाले, देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची महाशक्तीच्या दिशेने कशी आपले वाटचाल सुरू आहे. या सगळ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्प सिद्धीस नेणारा भारत म्हणून हा पंतप्रधान मोदी यांचा अकरा वर्षाचा कालखंड ओळखला जाणार आहे. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारांमध्ये गुरफटलेला भारत दिसत होता. जगात भारताच्या पंतप्रधानाची पती हरवले गेली होती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जग पातळीवर जो देशाला मान सन्मान मिळत आहे यातून आपल्या कारकीर्दीत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामाची पोच पावती मिळते.

ना खाऊंगा ना खाणे दुंगा या भूमिकेमुळे २०१४ पासून ते आतापर्यंत आज अकरा वर्षात भ्रष्टाचार मुक्त मुक्त झाला. आज भारतीची दखल घेतल्याशिवाय जगात एक सुद्धा घटना घडत नाही.भारत देश जपानच्या पुढे गेला. २०२९ पर्यंत मोदी साहेबाच्या नेतृत्वात देश जागत दुसऱ्या स्थानी असेल. आता घोटाळे संपले, उद्योगपती लोकांचे पैसे घेऊन पळून जाण्याची हिंमत करू शकत नाहीत. कारण जागच्या पाठीवर भ्रष्ट्राचार करणारे,जनतेला लुटणारे कोठेच लपून राहू शकत नाहीत अशी व्यवस्था मोदी सरकारने लावलेली आहे.

ऑपरेशन सिंदूर हे भारत देश खंबीर असल्याची पोच पावती देणारे ऑपरेशन होते. ऑपरेशन सिंदूर नंतर कोणताही देश वाकड्या नजरेने आपल्या देशाकडे पाहू शकत नाही. अशी प्रतिमा देशाची तयार केली आहे. मोदी सरकारने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर दाखवून देत पाकिस्तान, चीन, बांगलादेश यांनी भविष्यात कोणतीही चूक केली तर त्याचे प्रत्युत्तर मिळेल आणि त्याची फळे भोगावे लागतील असा संदेशच या ऑपरेशन सिंदूर मधून दिला आहे.

देशातील नक्षल चळवळ संपुष्टात आणले आहे. मोदीच्या संकल्पना आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नातून नक्षल मुक्त भारत केला आहे. ३७० कायदा हटविला, राममंदिर उभे केले. यांच्यासह अनेक महत्वाचे निर्णय घेतले. विविध योजना राबवून जनतेला सक्षम केले. शेतकऱ्यांचे पैसे थेट खात्यात दिले. आजही शेतकरी सन्मान योजना सुरू आहे. मोफत अन्न धान्य वाटपाचा निर्णय घेतला. ती योजना सुरू आहे. रोजगाराची मोठ्या प्रमाणात वाढ केली. भारत देश रोजगार देणारा देश बनला. एप्पल सारख्या अनेक कंपन्या आपली कंपनी पहिली भारतात सुरू करत आहेत. २५ हजार कोटी समुद्र किनाऱ्याच्या विकासासाठी तरतूद करून मोदी सरकारने ठेवली आहे.व्यापारी वर्गात सुद्धा अनेक बदल त्यांनी केले आहे. २०१४ पूर्वीच्या पंतप्रधान आणि आताचे महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या देशाचे पंतप्रधान यांच्यातील फरक आज जगाला अनुभवायला मिळत आहे. जपान पेक्षाही आपण पुढे गेलो आहेत. याचे श्रेय मोदींना जाते. कुटुंब प्रमुख म्हणून भावना ओळखल्या आणि ऑपरेशन सुंदर केले. आणि माता भगिनींना न्याय दिला ही मोदी सरकारची कामगिरी आहे. ११ वर्षात त्यांनी विकसित भारत कसा असतो हे दाखवून दिले आहे.त्यांनी येत्या काळात महासत्ता होणार आहे. ऑपरेशन सुंदर च्या माध्यमातून मोदी सरकारने नव्या भरतीची ओळख जगाला करून दिली आहे. करारा जबाब देऊन वाकड्या नजरेने पाहणाऱ्या सुद्धा इशारा दिला आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा