You are currently viewing मसुरेतील लक्ष परब ९ व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेत रौप्य पदकाने सन्मानित

मसुरेतील लक्ष परब ९ व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेत रौप्य पदकाने सन्मानित

मसुरे देऊळवाडा येथील लक्ष अश्विन परब याने उत्तराखंड हरिद्वार येथे आयोजित ९ व्या राष्ट्रीय स्टुडंट्स ऑलिम्पिक कॅरम स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. मुंबई डोंबिवली येथे आय. ए .एस पाटकर या विद्यालयात नववीत शिकत असलेला लक्ष परब याने यापूर्वी शहरी आणि जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळविली आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेनंतर लक्ष परब याची निवड आंतरराष्ट्रीय टीम मध्ये झाली आहे. लक्ष परब यास रोख रक्कम आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेत पाटकर विद्यालयाच्या ९ स्पर्धकांना सुवर्ण आणि रोप्य पदक प्राप्त झाली. लक्ष अश्विन परब हा मसुरे देऊळवाडा येथील चंद्रकांत दत्ताराम परब यांचा नातू आहे. चंद्रकांत परब हे सुद्धा चांगले कॅरम पटू आहेत. या यशाचे श्रेय आजोबा, आई वडील आणि प्रशिक्षक विवेक म्हात्रे, प्रदीप साटम मीनल लेले याना आहे. लक्ष परब याचे मसुरे गावातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 4 =