You are currently viewing सावंतवाडीत ५२ ग्रामपंचायतीसाठी चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ६८ तर २९६ जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल

सावंतवाडीत ५२ ग्रामपंचायतीसाठी चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ६८ तर २९६ जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून ५२ ग्रामपंचायत निवडणूका होवू घातल्या आहेत. येत्या १८ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. नामनिर्देशन पत्र उद्यापर्यंत दाखल करण्यात येणार आहेत. या नामनिर्देशन पत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी व उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या निवडणुकीच मतदान १८ डिसेंबर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी २० डिसेंबर रोजी होणार आहे. ५२ ग्रामपंचायतीसाठी चौथ्या दिवशी सरपंच पदासाठी ६८ तर २९६ जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केली आहेत.

या निवडणुकीत आजगाव, आंबेगाव, असनिये, बांदा, भालावल, भोमवाडी, चराठे, डेगवे, देवसू दाणोली, धाकोरे, गेळे, गुळदूवे, कलंबिस्त, कारीवडे, कास, कवठणी, केसरी फणसवडे, किनळे, कोनशी दाभीळ, कुडतरकरटेंब सावरवाड, कुणकेरी, माडखोल, मडुरा, माजगाव, नाणोस, नेमळे, नेतर्डे, न्हावेली, निगुडे, निरवडे, ओटवणे, ओवळीये, पाडलोस, पडवे-माजगाव, पारपोली, रोणापाल, सांगेली, सरमळे, सातार्डा, साटेली तर्फ सातार्डा, सातोसे, सातुळी बावळाट, शेर्ले, शिरशिंगे, सोनुर्ली, तळवणे, तांबुळी, तिरोडा, वाफोली, वेर्ले, वेत्ये, विलवडे या ५२ ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा