You are currently viewing कवी मिथुन गौतम ढिवरे यांच्या ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहाचे मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

कवी मिथुन गौतम ढिवरे यांच्या ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहाचे मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

जळगाव:

महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते कवी मिथुन गौतम ढिवरे यांच्या ‘हरवलेला काळ’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन आयुक्त सभागृहामध्ये आज करण्यात आले. प्रकाशनाच्या वेळी “नवोदित कवी आणि लेखक यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून समाजाची सेवा करावी” अशा भावना आयुक्त मॅडम यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र जाधव होते. कार्यक्रमाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये काव्यसंग्रहाला प्रस्तावना देणारे आणि शैक्षणिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे खिरोदा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. साहेबराव त्र्यंबकराव भुकन यांचा विशेष सत्कार आयुक्त विद्या गायकवाड मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक आबासाहेब कापसे होते. कार्यक्रमाला के.वाय. सुरवाडे, प्रा. डॉ. संजीव साळवे, डॉ.अनिल शिरसाळे, बी. एस. पवार, नंदाताई बोदोडे, सिद्धांत बोदोडे, मिनिस्टर इमोवन, फोटोग्राफर संदीप बाविस्कर आणि सुभाष सपकाळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद ढिवरे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा