You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी*

*कातकरी समाजातील महीलांना साड्या व पुरुषांना ब्लॅंकेटचे वाटप*

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अर्थात ” राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस ” साजरा केला . तालुका कार्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे महीला मोर्चा च्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . त्यानंतर वेंगुर्ले शहरातील कॅम्प येथील कातकरी समाजाच्या वस्तीमध्ये जाऊन महीलांना साड्या व पुरुषांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले .
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई यांनी राष्ट्रीय जनजाती गौरव दिवस म्हणजे देशातील १२ कोटी अनुसूचित जनजाती समाजाच्या स्वाभिमानाचा , अस्मितेचा आणि भारतीय इतिहासात जनजाती बांधवांच्या गौरवशाली , शौर्यशाली आणि तेजस्वी पराक्रमाच्या योगदानाची सुवर्ण अक्षरांनी दखल घेणारा अविस्मरणीय असा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगितले .


जननायक क्रांतीसुर्य बिसरा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंड राज्यातील उलीहातु येथे झाला . आदिवासी समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्यासाठी बिरसा मुंडा यांचें नांव घेतलं जाते . आदिवासी समाजाच्या ” उलगुलान ” आंदोलनाचे ते जनक होते . बिसरा मुंडा यांना ” धरतीबाबा ” म्हणून ओळखले जायचे . त्यांनी आदिवासी समाजात केलेली जनजागृती आणि व्यापक मानवसेवेमुळे आजही असे धरतीबाबा मिळावेत अशी प्रार्थना संपुर्ण देशात केली जाते . म्हणून आदिवासी भागांमध्ये क्रांतीकारी बिसरा मुंडा ईश्वरासमान पुजले जातात .


यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसऺन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवऺडळकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर , महीला मोर्चा ता.अध्यक्षा स्मिता दामले , शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर , कुडाळ शहर अध्यक्षा मुक्ती परब , माजी नगराध्यक्षा डॉ.पुजा कर्पे , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , ता.सरचिटनीस बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , युवा मोर्चाचे नारायण कुंभार व पींटु सावंत , सोशल मीडियाचे अमेय धुरी , बुथ अध्यक्ष सुधीर पालयेकर व पुंडलिक हळदणकर , नगरसेवीका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर , महीला सरचिटणीस वृंदा गवंडळकर , अल्पसंख्याक सेलच्या हसीनाबेन मकानदार , खानोली सरपंच प्रणाली खानोलकर , माजी सरपंच समीधा कुडाळकर , ग्रा.पं.सदस्या लक्ष्मी परब , रिमा मेस्त्री , सावरी शेलटे , नंदिनी आरोलकर , रसीका मठकर , आकांक्षा परब , मानसी परब , कृष्णा हळदणकर तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 20 =