You are currently viewing छत्रपती संभाजी नगर मध्ये श्री शृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव

छत्रपती संभाजी नगर मध्ये श्री शृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्योत्सव

*डॉ. शैलजा करोडे अध्यक्ष तर उद्घाटक प्रा. कवी चंद्रकांतदादा वानखेडे*

 

छत्रपती संभाजीनगर :

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिष्ठान संचलित शब्द स्वरूप साहित्य मंच ब्रह्मगाव या सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून स्वर्गीय कौशल्याबाई बबन भालेकर यांच्या स्मुती प्रित्यर्थ श्री शृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्यत्सवाचे आयोजन रविवारी ७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले.

गेल्या तीन वर्षापासून सौ.पूजा राजेश घोंगडे यांच्या संकल्पनेतून शब्द स्वरूप साहित्य मंचाच्या वतीने श्री शृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्यत्सवाचे आयोजन छत्रपती संभाजी नगर येथे करण्यात येते. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी श्री शृंगेरी देवी राज्यस्तरीय काव्यसवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ कवयित्री डॉ.शैलजा करोडे भूषविणार असून उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे असतील.

कवी महादेव लांडगे, कवी ज्ञानेश्वर शिंदे, कवी डॉ. सुनील पवार,कवयित्री सुनिता कावसनकर, पोपट श्रीराम काळे पुणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तरी जास्तीत जास्त कवी, कवयित्रीनी काव्योत्सवात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पूजा घोंगडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शब्दस्वरूप साहित्य मंच संचालक मंडळ साहित्यिक परिवार विशेष परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा