You are currently viewing श्री रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे श्रावण मास भजनानंद साेहळ्याचे उद्घाटन

श्री रामेश्वर मंदिर भिरवंडे येथे श्रावण मास भजनानंद साेहळ्याचे उद्घाटन

कणकवली

कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री रामेश्वर मंदिर येथे युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित श्रावण मास निमित्ताने दर सोमवारी दुपारी दोन ते सहा वाजेपर्यंत भजनानंद सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आज एक ऑगस्ट रोजी या भजनानंद सोहळ्याचे दीप प्रज्वलन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी रमेश सावंत, महेंद्र सावंत , महादेव (आबा ) सावंत, सत्यवान सावंत, ग्रामस्थ व भजन प्रेमी हजर होते. पहिल्या श्रावण सोमवारी अभिषेक शिरसाठ, वीजय परब , रामदास कासले बुवा यांनी सुस्वर संगीत भजने सादर करून या भजनानंद सोहळ्याची शोभा वाढवून मंदिर परिसरात चैतन्य निर्माण केले. या वेळी युवा संदेश प्रतिष्ठान चे भिरवंडे गावचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व बुवांचे यूवा संदेश प्रतिष्ठान च्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार रमेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भजन प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा