You are currently viewing सौ.राजश्री बाळकृष्ण सावंत (रा.पेंडुर, मालवण) यांचे दीर्घ आजाराने निधन…

सौ.राजश्री बाळकृष्ण सावंत (रा.पेंडुर, मालवण) यांचे दीर्घ आजाराने निधन…

मालवण

मालवण तालुक्यातील पेंडुर येथील सौ.राजश्री बाळकृष्ण सावंत  (वय ७५) यांची दीर्घ आजाराने आज पहाटे ४.३० वाजता प्राणज्योत मालवली. मुंबई येथे पोटातील कर्करोगावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेले दहा महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला.
मालवण आगारातील सेवानिवृत्त वाहक बाळकृष्ण सावंत यांच्या त्या पत्नी, तर दिनेश, महेश(आप्पा) सावंत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे, दिर, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. पेंडुर येथील स्मशानभूमीत सकाळी ११.०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − twelve =