You are currently viewing आला सण नागपंचमीचा

आला सण नागपंचमीचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांची काव्यरचना..*

*आला सण नागपंचमीचा*

होता सुरुवात श्रावणाला….
पसरे आनंद हर्ष सारा
नटली पान फुलांनी धरा
हिरवे रान लेवूनी मोती,
चमकती दवबिंदूंनी पाती
सुटता वारा मिळे गारवा,
माळावर फुले मोर पिसारा.
थुई थुई थुई थुई मोर नाचे
प्रभातकाली ऊन पसरे
झाडापेडांमधुनी डोकावे
जणू धरेच्या प्रेमात पडे.

सण पहिला श्रावणातला…
आला सण नागपंचमीचा
सजला पाट रंगल्या भिंती
रांगोळी काढी पाटा भोवती
अळवाच्या पानावर शोभे
नागराज हे मूर्तिमंत उभे
दूध लाह्यांचा नैवेद्य दाविला
हळदीच्या पानात थापूनी
उकडीच्या केल्या पातोळ्या
हळद पिंजर अष्टगंध लावूनी
पत्री फुले दुर्वा अक्षता वाहूनी
दीप धूप दिव्यांनी ओवाळूनी
भक्तिभावे नागराज पूजिले.

नागराज मित्र शेतकऱ्यांचा
करीतो रक्षण शेतांचे
फुले वाहूनी वारुळाला
ऋण फेडतो राजा सापाचे
माहरेवाशी बहिणी लाडक्या
ठेवीती उपवास भावासाठी
हिंदू संस्कृती अन परंपरेचा
सण पहिला आनंदाचा
श्रावणात गोडधोड खाण्याचा…

(दिपी)
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − eight =