You are currently viewing काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची धुरा इर्शाद शेख यांच्याकडे….

काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची धुरा इर्शाद शेख यांच्याकडे….

प्रदेश काँग्रेसकडुन निवड; नियमित अध्यक्ष निवडीपर्यंत कार्यभार राहणार…

सावंतवाडी

काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर प्रभारी जिल्हाध्यक्ष वेंगुर्ले येथील इर्शाद शेख यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. नियमित अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार श्री. शेख यांनी सांभाळावा,असे त्या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा