You are currently viewing ८ डिसेंबर ते १० डिसेंबर भालावल प्राथमिक शाळा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

८ डिसेंबर ते १० डिसेंबर भालावल प्राथमिक शाळा शतक महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

ओटवणे :

भालावल प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त शुक्रवार ८ डिसेंबर ते १० डिसेंबरपर्यंत विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण तर उद्घाटक राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा उद्योजक विशाल परब, माजी सभापती अशोक दळवी, रवींद्र मडगावकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर तहसीलदार श्रीधर पाटील गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती प्रमोद कामत, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना घारे परब, युवा सामाजिक कार्यकर्ता दिनेश गावडे, मकरंद तोरसकर काजू व्यापारी भाऊ वळंजू, केंद्रप्रमुख श्रद्धा महाले, ग्रामसेवक तृप्ती राणे, माजी उपसभापती विनायक दळवी, कृष्णा सावंत, उद्योजक एकनाथ दळवी, तलाठी नेत्रा सावंत, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी सकाळी १० वाजता जनजागृती फेरी आणि शाळेच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन, सकाळी ११ वाजता पाककला स्पर्धा, सायंकाळी ६:३० वाजता वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि मुलांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा, दुपारी २:३० वाजता महिलांचे फनी गेम्स, रात्री ८:३० वाजता शाळेच्या माजी विद्यार्थी आणि महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रविवारी १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ३ वाजता ग्रामस्थांची भजने, सायंकाळी ७ वाजता आजी-माजी विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, रात्री १० वाजता ‘गंगाजल’ हा ट्रिकसीन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शतक महोत्सव समिती अध्यक्ष महेश परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आत्माराम परब, पालक शिक्षक व माता पालक संघ तसेच सरपंच समीर परब, उपसरपंच अर्जुन परब, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नम्रता कोठावळे आणि भालावल ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा