You are currently viewing कणकवली कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात संपन्न..

कणकवली कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात संपन्न..

जगभरामध्ये १२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट या कालावधीमध्ये ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ निमित्त वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी पिढीजात एकात्मता: सर्व वयोगटासाठी जग या संकल्पनेवरती सर्वत्र वेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. कणकवली कॉलेज कणकवली मध्ये नुकताच आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सुनील ढाणूकसे, जिल्हा पर्यवेक्षक, एड्स नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची बाजू म्हणजे सर्व वयोगटातील लोकांना समजून घेणे. हे शक्य झाले तरच समाजामध्ये ऐक्य प्रस्थापित होऊ शकते. असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना एड्स नियंत्रणासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. एड्सग्रस्त व्यक्तींना समाजामध्ये आधाराची आवश्यकता असते त्यामुळे त्यांच्याशी चांगली वर्तणूक ठेवणे आवश्यक आहे. असेही मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, सुशील परब, व कीर्ती पवार उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले म्हणाले की, सर्व वयोगटातील व्यक्तीबरोबर आपले वर्तणूक चांगले असणे आवश्यक आहे. वयोवृद्ध व्यक्तींना एकटेपणाची जाणीव होऊ नये. बदलणाऱ्या समाजामध्ये वयोवृद्ध व्यक्तींचे एकटेपण बऱ्याच वेळा दिसून येते यावरती चिंतन आवश्यक आहे. पिढीजात एकात्मतेसाठी शिक्षण महत्वपूर्ण घटक ठरतो त्यामुळे विद्यार्थीदशेमध्येच विद्यार्थ्यांना याबद्दल मार्गदर्शन करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमांतर्गतच फेस पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी सर्व यशस्वी स्पर्धकांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन प्रा.डॉ. साळुंखे यांनी केले. व सदर कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी स्पर्धक खालील प्रमाणे -:

प्रथम क्रमांक: संकेत घाडीगावकर व किमया हिंदळेकर

द्वितीय क्रमांक:कृती गोसावी व हर्षदा चव्हाण.

तृतीय क्रमांक: प्रथमेश घाडी व कस्तुरी पाताडे.

उत्तेजनार्थ: नम्रता गावकर व रेवा राणे

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, कणकवली कॉलेज, कणकवली यांनी आय. सी. टी. सी. कणकवली प्रतिनिधी सुशील परब व कीर्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. कार्यक्रम आयोजनामध्ये प्रा. सुरेश पाटील, प्रा. विनया रासम, प्रा. सागर गावडे, प्रा. अदिती मालपेकर, प्रा. गीतांजली सापळे, प्रा. पल्लवी गोखले यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × one =