You are currently viewing मी अशीच आहे

मी अशीच आहे

*भारतीय सांस्कृतिक व साहित्य मंच कोल्हापूर समूह सदस्या लेखिका कवयित्री मनीषा चिद्दरवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*मी* *अशीच आहे*

नाही व्यक्त होता येत
मला माझ्या मनातले
ह्दयातच ठेवते साचून
बोल माझ्या ओठातले…

कुणाला काय सांगावे
काहीच समजत नाही
ऐकून घेणा-याला माझ्या
व्यथाची जाण नाही…

सांगतात सर्वजण मला
मोकळी हो कुणाजवळ
टेंशन वाढवून का घेतेस
बोलून टाक मैत्रीणीजवळ….

हो हो म्हणता असेच
जातात दिवस सरून
भाव माझ्या मनातील
असेच जातात मरून……

सर्वासमोर सदा हसावे
हेच आहे माझे नित्य कर्म
रंगमचाच्या पडद्यावरील
अभिनय करावे असे हे धर्म….

मनिषा चिद्दरवार, दिग्रस
7741951850

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 12 =