You are currently viewing स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीतर्फे महिलांकरीता उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीतर्फे महिलांकरीता उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा

कणकवली

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट , कणकवली यांच्या माध्यमातून व स्वयंसिद्धा , कोल्हापूर यांच्या मार्फत युवक , युवती , बचतगट व उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांकरीता उद्योजकता प्रेरणा कार्यशाळा मार्गदर्शन स्वयंसिद्धा कोल्हापूरच्या
संचालिका कांचनताई परूळेकर व सहकारी रविवार ७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ ते सायं . ४ पर्यंत मातोश्री मंगल कार्यालय , कणकवली येथे कार्यशाळेत करणार आहेत.

या कार्यशाळेत उद्योग करणे गरजेचे आहे,उद्योग का करावा, उद्योग कसा करावा यांचे मार्गदर्शन यामध्ये पोस्टर , प्रात्यक्षिक व व्याख्यान दिले जाईल . प्रथम नावनोंदणी करणे आवश्यक आहे. कांचनताई परुळेकर या अनेक महिलांचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी अनेक उद्योजिका निर्माण केलेले आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे. स्वयंदीप ट्रस्टच्या माध्यमातून व स्वयंसिद्धाच्या मार्गदर्शनाखाली कणकवली मध्ये यापुढे कायम स्वरूपी प्रशिक्षणे मिळणार आहेत. युवक,युवती,बचत गट व उद्योग करू इच्छिणाऱ्या महिलांनी संदिप सावंत ( 9421235839 ) , अॅड . मनिषा सावंत ( 9422056543 ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा