You are currently viewing राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चा निकाल जाहीर

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चा निकाल जाहीर

जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात होणार बक्षीस वितरण

विजेत्या स्पर्धकांनी उपस्थित राहण्याचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन.

वैभववाडी

२४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चा निकाल जाहीर झाला आहे.
अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याची जाणीव व्हावी, ग्राहक चळवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावी आणि शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी २४ डिसेंबर या “राष्ट्रीय ग्राहक दिना”निमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने तीन गटात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून कनिष्ठ महाविद्यालय गटात कु.कोमल शिवराम पाताडे, (१२ वी विज्ञान,ज्युनिअर कॉलेज,कासार्डे), महाविद्यालय गटात कु.प्रफुल्ली प्रभाकर दळवी (तृतीय वर्ष वाणिज्य, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी)
तर खुल्या गटात श्री.पाडुरंग विष्णू दळवी, वेंगुर्ला यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अशा तीन गटात आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-
१)पहिला गट- कनिष्ठ महाविद्यालयीन गट (इयत्ता ११ वी व १२ वी)
विषय- जागो ग्राहक जागो.
प्रथम- कोमल शिवराम पाताडे, जुनिअर कॉलेज कासार्डे
व्दितीय- मानसी अशोक मेस्त्री, श्री.न.शां. पंतवालावलकर जुनिअर कॉलेज, देवगड
तृतीय- साहिल रघुनाथ कासार, राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी

२)दुसरा गट- महाविद्यालय गट
विषय- आभासी (ऑनलाईन) बाजारपेठ आणि ग्राहक.
प्रथम- प्रफुल्ली प्रभाकर दळवी, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी
व्दितीय- रुचिता चंद्रकांत दळवी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगुळवाडी
तृतीय- शांभवी उल्हास कुळकर्णी, कणकवली कॉलेज

३)तिसरा गट- खुला गट
विषय- अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू – ग्राहक.
प्रथम- श्री.पाडुरंग विष्णू दळवी, वेंगुर्ला
व्दितीय- श्री.नागेश रघुनाथ कदम, मालवण
तृतीय- स्वरुपा संजय पांगळे, कृषी महाविद्यालय सांगुळवाडी यांनी मिळविले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीम.के.मंजूलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम तहसीलदार कार्यालय देवगड यांच्यावतीने आयोजित केला आहे. सदर कार्यक्रम श्री.स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रु.५०१/-, ३०१/- व २०१/- व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याची सर्व विजेत्या स्पर्धकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील (9834984411), उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा