मालवण मध्ये डेडीकेटड कोवीड हेल्थ सेंटर सुरु

मालवण मध्ये डेडीकेटड कोवीड हेल्थ सेंटर सुरु

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यसाठी प्रतिबंधत्माक उपाययोजनेच्या दृष्टीने जिल्हृयातील खाजगी रुग्णालयांना कोवीड हेल्थ सेंटर म्हणून खालील रुग्णालयाला  परवानगी देण्यात आली आहे. झांटये क्लिनिक व अंकुर हॉस्पीटल सोमवार पेठ,भरड मालवण,तालुका मालवण या  रुग्णालयाला डीसीएचएसी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या ठिकाणी  डॉ. मालविका झांटये एम.डी (जनरल मेडीसिन) या डॉक्टर उपलब्ध  असणार आहेत. तसेच 3 आयसीयु व 2 जरनरल बेडस असणार आहेत. असे डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग  हे कळवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा