You are currently viewing बांदा येथे “आषाढ महोत्सवा”चा मनीष दळवींच्या हस्ते शुभारंभ…

बांदा येथे “आषाढ महोत्सवा”चा मनीष दळवींच्या हस्ते शुभारंभ…

बांदा

येथील माजी सरपंच बाळा आकेरकर मित्रमंडळ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित आषाढ महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, गोगटे वाळके कॉलेजचे विश्वस्त प्रेमानंद चुडेदेसाई, सरपंच अक्रम खान, माजी उपसभापती शीतल राऊळ, रोटरी क्लब बांदाचे अध्यक्ष मंदार कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर उर्फ भाई सामंत, कातकरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह अध्यक्ष उदय आईर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, माजी उपसभापती विनायक दळवी, ज्येष्ठ भजनकर्मी गिरीश महाजन, बाळा आकेरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, जयसिंग राणे, नारायण गावडे आदी उपस्थित होते.
यावेळी यशप्राप्त विद्यार्थी युती राऊळ, साक्षी प्रभूशिरोडकर, प्राजक्ता डुगल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, नाग्या महादू कातकरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह संस्थापक अध्यक्ष उदय आईर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार भास्कर उर्फ भाई सामंत, जयसिंग उर्फ दादा राणे, सरपंच अक्रम खान, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, प्रमोद कामत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी सादर करण्यात आलेल्या द्रोण-पर्व (वीर अभिमन्यू) या संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व वक्त्यांनी आषाढ महोत्सव व बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 15 =