You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ इंग्लिश मिडीयम चे यश

शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ इंग्लिश मिडीयम चे यश

कुडाळ :-

महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत क.म.शि.प्र मंडळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेने घवघवीत यश संपादन केले.

या परीक्षेत कुमारी श्रुती सहदेव घाडीगावकर व कुमार आर्यन उमेश चव्हाण यांनी शिष्यवृत्ती पटकाविली आहे. इयत्ता पाचवी मधून कु. श्रुती सहदेव घाडीगावकर हिने शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 18 वा. क्रमांक तर कु. आर्यन उमेश चव्हाण याने शहरी सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात 41 वा क्रमांक पटकाविला आहे.

या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका मुमताज शेख व शिक्षिका भावना धुरी, स्नेहा परुळेकर, पूर्वा राऊळ, कविता साबलपरा, झेबा आवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विद्यार्थ्यांचे कुडाळ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका तसेच क.म. शि. प्र. मंडळाचे संस्था पदाधिकारी , शिक्षक व पालकांतून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा