You are currently viewing कणकवली शहराच्या सुधारीत डीपी प्लान मध्ये शहरवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार नितेश राणे 

कणकवली शहराच्या सुधारीत डीपी प्लान मध्ये शहरवासीयांवर अन्याय होऊ देणार नाही – आमदार नितेश राणे 

कणकवली :

कणकवली शहराचा डीपी प्लान बनवत असताना यात कणकवली शहरातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. यापूर्वी काही नगरपालिकांमध्ये डीपी प्लानमध्ये सुधारणा करत असताना काहींचा दुर्लक्ष झाला. तसा दुर्लक्ष कणकवली नगरपंचायत च्या डीपी प्लान मध्ये होणार नाही असा शब्द मी कणकवली वासीयांना देतो अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. तसेच कणकवली नगरपंचायत च्या डीपी प्लान मध्ये सुधारणा करत असताना त्या सर्व बारकावे पाहिले जातील. जनतेच्या सोयी सुविधांवर भर दिला जाईल. 1999 मध्ये ज्या बिनशेती जमिनीवर आरक्षणे टाकली आहेत ती आरक्षणे वगळण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून ठोस निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल असेही श्री. राणे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही प्रकारे जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे कणकवली वासियांनी डीपी प्लान संदर्भात कुणाच्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन श्री राणे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + thirteen =