You are currently viewing सातार्डा कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी हवा..

सातार्डा कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी वैद्यकीय कर्मचारी हवा..

शिवशंभु संघटनेचे तहसीलदारांना निवेदन..

सावंतवाडी :

सातार्डा येथील कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. अशा आशयाचे निवेदन शिवशंभु संघटनेने सावंतवाडी तहसीलदार यांना दिले आहे.

यावेळी शिवशंभु संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन उर्फ समीर सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यामेश्वर कवठणकर उपस्थित होते.

सातार्डा येथे कोविड सेंटर सुरू केल्यामुळे कोविड रुग्णांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याबद्दल शिवशंभु संघटनेने तहसीलदारांचे अभिनंदन केले. या कोविड सेंटरमध्ये दिवसभर वैद्यकीय कर्मचारी भेट देतात. परंतु रात्रीच्या वेळी कोणीही वैद्यकीय कर्मचारी नसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्ण अत्यवस्थ झाला तर त्याला सावंतवाडीला दाखल करावे लागते. याकरिता रात्रीच्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी शिवशंभु संघटनेने तहसीलदारांकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 5 =