You are currently viewing कुपेरी घाटीत कार अपघातग्रस्त…

कुपेरी घाटीत कार अपघातग्रस्त…

प्रवाशांना किरकोळ दुखापत; कारचे मोठे नुकसान

मालवण
मालवण कसाल हमरस्तावर साळेल -नांगरभाट जवळील कुपेरीचीघाटी येथील अवघड वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार घाटीत कोसळल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात कार मधील दोघांना किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ही कार (एम एच ०७ एजी ०४५२) मालवण हून कसालच्या दिशेने जात होती. कुपेरीची घाटी येथील अवघड वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ही कार रस्त्याशेजारी झाडाला आदळल्याने अपघात घडला. अपघातामध्ये चालकाच्या बाजुला व मागे बसलेल्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भयानक होता की मालवण वरून कसालच्या दिशेने जाणारी ही कार झाडाला धडक दिल्यावर कारचे तोंड पुन्हा मालवणच्या दिशेला होऊन ती कार गटारामध्ये जाऊन आदळली. अपघातग्रस्त ठिकाणी कारचे नुकसान पाहता अपघाताची तीव्रता लक्षात येत होती. या मार्गाने वहातुक करणारे वाहनचालक, ग्रामस्थ व पोलिसांनी जखमीना रुग्णालयात दाखल केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − 8 =