You are currently viewing विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान

विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे ८० रक्तदात्यांनी केले रक्तदान

*आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प पूर्ण*

कणकवली :

 

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेज येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबीराचे उदघाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांचे मित्र आणि कोल्हापूर येथील उद्योजक स्वरूप कदम यांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली.यामध्ये एकूण ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प ठेवण्यात आला होता. कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करून हा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी कॉलजेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच पुष्पहार घालून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी सतीश सावंत म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी यासाठी फार्मसी कॉलेज सुरु केले. या कॉलेजची झालेली प्रगती आम्ही पाहत आहोत आणि ऐकली आहे. कॉलेजची झालेली प्रगती हि आ. वैभव नाईक यांच्या कार्याची पोचपावती आहे. कोरोना काळात हे कॉलेज रुग्ण सेवेसाठी दिले होते. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचले.समाजसेवेची परंपरा अशी कायम सुरु राहो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उद्योजक संतोष गाडगीळ, उद्योजक सुहास गावडे, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सचिव रमन बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य डॉ. जगताप, प्रा. कुलकर्णी, प्रा. मेघा बाणे, आदिती सावंत आदींसह शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा