You are currently viewing शेतकऱ्यांना सुुफला खताचे मोफत वाटत..

शेतकऱ्यांना सुुफला खताचे मोफत वाटत..

सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यातील तंटामुक्त गाव असलेल्या तुळसुली ग्रामपंचायती मार्फत येथील शेतकऱ्याना मोफत खत वाटत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला पाच किलो सुफला खताचे वाटप यावेळी करण्यात आले.
सध्या बाजारात खतांचा तुटवडा असून खत लगेच उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण समजून शेतकऱ्याना खत उपलब्ध व्हावे यासाठी तुळसुली ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
गावातचं खत उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सरपंच सौ.सुचिता तुळसूलकर, उपसरपंच विजय वारंग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा