You are currently viewing रेणुका गझलमंच प्रतिष्ठान तर्फे विनामूल्य गझल कार्यशाळेचे आयोजन

रेणुका गझलमंच प्रतिष्ठान तर्फे विनामूल्य गझल कार्यशाळेचे आयोजन

*संयोजक – डॉ.वैभव लोखंडे, मुंबई*

 

मुंबई :

 

गझल शिकण्यास इच्छुक व ज्यांनी कोणत्याही गझल कार्यशाळेत आजपर्यंत प्रवेश घेतलेला नाही अशांनी रेणुका गझलमंच प्रतिष्ठान आयोजित गझल कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक व ज्येष्ठ गझलकार डॉ.वैभव लोखंडे मुंबई व गझलकार प्रा.डॉ.रे.भ.भारस्वाडकर यांनी केले आहे. सदरची कार्यशाळा विनामूल्य असून कार्यशाळेत देशातील नावाजलेल्या गझलकरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.

रेणुका गझलमंच प्रतिष्ठान आयोजित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर, छ.संभाजीनगर, प्रा.सुनंदा पाटील उर्फ माई, मुंबई, डाॅ.शेख इक्बाल मिन्ने, छ.संभाजीनगर, श्री.प्रसाद कुलकर्णी, इचलकरंजी, डाॅ.राज रणधीर, जालना, गौतम सूर्यवंशी, सेलू, जि.परभणी, अंजली दिक्षित-पंडित, छ.संभाजीनगर, सुरेंद्र टिपरे सर, रत्नाकर जोशी, जिंतूर, आत्माराम कदम, मुंबई, अनिकेत सागर, आणि तरुण गझलकार हर्षल आचरेकर आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या कार्यशाळेत लेव्हल-1 कार्यशाळा यशस्वी करणाऱ्या नवोदित गझलकार / गझलकारास, मे महिन्यात पुणे येथे रेणुका गझलमंच प्रतिष्ठान, तर्फे होणाऱ्या “मराठी गझल संमेलनात” गझल सादरीकरणाची संधी देण्यात येईल. सर्वांना आवाहन करण्यात येते की, ज्या कवी/कवयित्रिंना मराठी गझल शिकायची आहे, त्यांनी आपले नाव व मो.नं.(व्हाॅट्सॲप असलेला) खालील नंबर वर कळवावा. किंवा खालील लिंक वरून समूह जॉईन करावा असे आवाहन संयोजक डॉ.वैभव लोखंडे व गझलकार प्रा.डाॅ.रे.भ.भारस्वाडकर यांनी केले आहे.

संपर्कासाठी मो.9730093331

https://chat.whatsapp.com/H9PBMP2HfHPBuINIl43iIC

प्रतिक्रिया व्यक्त करा