You are currently viewing नका नादावू

नका नादावू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी, ठाणे यांनी गुरूपौर्णिमे निमित्ताने लिहिलेले अप्रतिम काव्यरचना*

#@ *नका नादावू* @#

सत्य न येथे कोठे लपले
*सत्य* असे केवळ भास
निष्ठा असेल जर कां गुरूंवर
त्यांचेवर ठेवा *विश्वास*
//१//
मार्ग काढावा *प्रपंचातून*
संसाराचे ओझे न मानता
गुरू करती *रक्षण* तुमचे
*हात* जोडावे येता जाता
//२//
वाट *वाकडी* परमार्थाची
नसते कोठे *दडलेली*
कृतीत *असते* सर्वांच्या
निद्रा नयनी *पेंगुळलेली*
//३//
चित्र असते *स्पष्ट* समोरी
ठेवा *उघडे* डोळे *नीट*
करू नका अतिरेक कशाचा
येण्या एवढा तुम्हा *वीट*
//४//
*स्तोत्रे पारायणे* करा तुम्ही
पण नका *शिणवू* कायेला
समाधान मिळवा गुरूमंत्रांतून
“धावत” येतील तुमचे हाकेला
//५//
गुरू गुरू करून नका नादाऊ
*अतिरेकही* होतो त्याचा
टाळलेत प्रदर्शन गुरू भक्तीचे
तरी आशीर्वाद मिळेल गुरूचा
//६//

विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी:९३२४३२४१५७
२६१/बुधवार/१३ जुलै २०२२

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + 10 =